By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 12, 2019 05:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - महाविकास आघाडीच्या खातेवाटपाची अखेर प्रतीक्षा संपली असून आज खातेवाटप जाहीर झालं. शिवसेनेच्या वाट्याला गृह आणि नगरविकास खातं देण्यात आलं आहे. प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली असून मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग आणि उच्च तंत्र शिक्षण या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
छगन भुजबळ यांना ग्रामविकास, जलसंपदा, सामाजिक न्याय या खात्यांची जबाबदारी दिली आहे. तर मंत्री जयंत पाटील यांच्याकडे अर्थ, नियोजन, गृहनिर्माण आणि सार्वजनिक आरोग्य या खात्यांची जबाबदारी दिली आहे. तर कॉंग्रेसच्या नितीन राऊत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल आणि उर्जा खातं सोपवण्यात आलं आहे.
एकनाथ शिंदे गृह व नगरविकास याशिवाय वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृत व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण अशी खाती सोपविण्यात आली आहेत.
राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ याच्याकडे प्रामुख्याने ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, उर्जा व अपारंपरिक उर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसायांचा कारभार सोपविण्यात आला आहे.
नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणी देण्यात आलेल्या निर्णयाचा फ....
अधिक वाचा