By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 24, 2019 11:57 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राष्ट्रवादीचे काँग्रेसते नेते जयंत पाटील यांनी आमदारांच्या पाठींब्याचे पत्र राजभवनात सादर केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची यादी राजभवनात दिली आहे. दुपारी अडीच वाजता राष्ट्रवादीची दुसरी बैठक होईल. या बैठकीत आमचे काल गैरहजर असलेले नेते उपस्थित असतील. आता अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी आता त्यांच्या घरी जात असल्याचे पाटील म्हणाले.
आम्ही राज्यपालांना दिलेल्या आमदारांच्या यादीत अजित पवार यांचे देखील नाव आहे. ते परततील असा विश्वास असल्याचे जयंत पाटील म्हणाले. सर्वच्या सर्व आमदार आमच्या संपर्कात आहेत. केवळ अजित पवार बाहेर आहेत. अजित पवार पुन्हा येतील असं तुम्हाला वाटतं का ? असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी 'कोशिश करने वालोंकी कभी हार नही होती' अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडीची बाजू मांडत आहेत. त्यांनी आतापर्यंतच्या घडामोडी न्यायमुर्तींना सांगत आहेत. आमच्या बाजूने बहुमत असल्याचेही त्यांनी न्यायालयात सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेली बहुमताची खात्री राज्यपालांना एकाकी कशी पटली असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला आहे.
महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात
देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निर्णय रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत अशीही मागणी केली आहे. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना प्रतिवादी केले. तसेच केंद्र आणि राज्य सरकारला प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायमूर्ती एन व्ही रमण्णा, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यासमोर सुनावणी होत आहे.
कोणत्या मागण्या ?
१. आजच (रविवारी) विधीमंडळात फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश द्यावे.
२. आजच विधानसभा सदस्यपदाची शपथ द्यावी.
३. राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या आधारावर शपथविधीसाठी निमंत्रण पाठवले. त्या संदर्भात कागदपत्रे सादर करावी. (कर्नाटकात जी परमेश्वरराव केसमध्ये सुप्रीम कोर्टानं कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याचा संदर्भ देऊन मागणी केलीय.)
४. फ्लोअर टेस्टचं व्हिडीओ रेकाँर्डींग करावं आणि त्याची काँपी सर्वोच्च न्यायालयात सादर करावी.
५. फ्लोअर टेस्ट घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष निवडण्यात यावा.
६. विधीमंडळात शक्तीप्रदर्शन चाचणीवेळी समर्थन आणि विरोधी गट तयार करावे. त्यानंतरच मतमोजणी करावी. म्हणजे समर्थनातील एका बाजूला उभे करावे आणि समर्थन नसलेले दुसऱ्या बाजूला उभे करावे.
७. फ्लोअर टेस्ट होई पर्यंत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यासंदर्भातचे कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नये.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी बंड करत भाजपशी हातमिळवणी केली. त्या....
अधिक वाचा