By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 15, 2019 01:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
आझम खान यांनी माझ्याबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य माझ्यासाठी अजिबात नवीन नाही. तुम्हाला आठवत असेल तर 2009 साली मी समाजवादी पार्टीची उमेदवार होते. त्यावेळी सुद्धा त्यांनी माझ्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर कोणी मला पाठिंबा दिला नव्हता. मी एक महिला आहे. आझम खान जे बोलले ते मी पुन्हा बोलू शकत नाही. मी त्यांच काय केलं आहे ते मला समजत नाही. जे ते सतत माझ्याबद्दल अशा पद्धतीने बोलत असतात असे जया प्रदा म्हणाल्या.
मी आझम खानला घाबरून रामपूरमधून पळणार नाही, तर त्याला हरवूनच मी काय आहे ते दाखवून देईन असा ठाम विश्वास व्यक्त करत जया प्रदा यांनी आझम खान यांना प्रत्युत्तर दिले आहे.
त्याच्या राजकीय दर्जा खालावला आहे. त्याने बोललेले शब्द मी तोंडाने पुन्हा उच्चारूही शकत नाही. त्याच्या विरोधात एफआयआर दाखल झाली आहे. त्याला निडणूक लढवण्यास बंदी घालावी. अशी माणसे जर निवडून आली तर लोकशाहीचे काय होईल, समाजात महिलांना स्थान उरणार नाही. जनता देखील त्याला सोडणार नाही, मी त्याचा पराभव करूनच मी काय आहे हे त्याला दाखवून देईन असा पलटवार जया प्रदा यांनी केला आहे. आझम खान यांनी रामपूरमधून भाजपच्या उमेदवार असलेल्या जया प्रदा यांच्यावर केल्याने टीकेची सर्व स्तरातून त्यांची निंदा होत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने देखील आझम खान यांनी केलेल्या अश्लील टीकेची दखल घेऊन त्यांना नोटीस बजावली आहे. तसेच आझम खान यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे.
जसजशा निवडणुकां तोंडावर येत आहेत तसतशी उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघा....
अधिक वाचा