ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

माजी मुख्यमंत्र्यांना व्यासपीठावरच अश्रू अनावर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2019 11:38 AM 2019-02-12T14:15:30+5:30

माजी मुख्यमंत्र्यांना व्यासपीठावरच अश्रू अनावर

शहर : देश

राजकारणाच्या विश्वाविषयी कोणतीच शाश्वती देता येत नाही. या पटलावर कधी कोण, कशी खेळी खेळेत आणि विरोधकांवर मात करेल याचंही चित्र स्पष्ट नसतं. चाणक्यनिती म्हणा, किंवा मग रणनिती या विश्वात कधी कोणाला घाम फोडेल आणि कोणाला रडायलाही भाग पाडेल हेसुद्धा सांगता येणं तसं कठीणच. अशा या राजकारणाता महाराष्ट्राच अनेकांनाच अुनभव येत असताना तिथे कर्नाटकातही याबाबतची प्रचिती आली.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांचा व्हायरल होणारा व्हिडिओ आणि त्यांचे अश्रू बरंच काही सांगून गेले. मांड्या येथे एका सभेला संबोधित करतानाच त्यांच्या भावनांचा बांध फुटला आणि कुमारस्वामी रडू लागले. या मतदारसंघात आपल्या मुलाचा पराभव झाल्याची बाब अधोरेखित करत जनतेने त्यांना एकटं पाडलं असल्याची भावना व्यक्त करत ते भावूक झाले.

डिसेंबर रोजी येथे होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या धर्तीवर ते येथे जेडीएसचे उमेदवार बी.एल.राजू यांच्यासाठी प्रचार करत होते. 'मला हे राजकारणच नको. मला मुख्यमंत्रीपदही नको. मला फक्त तुमचं (जनतेचं) प्रेम हवं आहे. माझ्या मुलाचा पराभव का झाला हे मला ठाऊक नाही. त्याने मांड्या येथून निवडणूक लढावी असंही मला वाटत नव्हतं. पण, त्याने निवडणूक येथूनच लढावी असं माझ्या इथल्या जवळच्या लोकांना वाटत होतं. त्यांनीच माझ्या मुलाला पाठिंबा दिला नाही. मला याच गोष्टीचं अत्यंत दु: होत आहे', असं म्हणताना कुमारस्वामी यांना त्यांचे अश्रू आवरता आले नाहीत.

निवडणुकीत पराभूत होण्याचं दु: नसल्याचं म्हणत कुमारस्वामी यांनी आपल्या लोकांनीच आपल्याला एकटं पाडल्याची खंत यावेळी व्यक्त केली. राजकारणाची खेळी करणाऱ्या नेतेमंडळींचं हे हळवं रुप गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात अनेकदा पाहायला मिळालं आहे. दरम्यान, कुमारस्वामी यांचा मुलगा आणि एच.डी. देवेगौडा यांचा नातू निखील हे मांड्या मतदार संघातून अपक्ष उमेदवार आणि कन्नड अभिनेत्री सुमलता अंबरीश यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं होतं.

मागे

दिल्लीश्वरांपुढे गुडघे टेकले नाहीत, 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर ताशेरे
दिल्लीश्वरांपुढे गुडघे टेकले नाहीत, 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर ताशेरे

उद्धव ठाकरे यांनी दिल्लीश्वरांपुढे गुडघे टेकले नाहीत, ढोंगाशी हातमिळवणी क....

अधिक वाचा

पुढे  

विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाला विरोध
विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाला विरोध

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ....

Read more