ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जेट एअरवेजची निधीसाठी धावाधाव, ४०० कोटी देण्याची मागणी...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 17, 2019 12:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जेट एअरवेजची निधीसाठी धावाधाव, ४०० कोटी देण्याची मागणी...

शहर : मुंबई

आर्थिक अरिष्टातील जेट एअरवेजने अवघ्या पाच विमानांसह देशांतर्गत विमानसेवा सुरू ठेवली आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी जेट प्रशासन निधी मिळवण्यास धावाधाव करत आहे. मात्र अद्याप त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही. तर, ४०० कोटी रुपये आणीबाणीची मदत मिळावी, अशी कंपनीची मागणी आहे. सोमवारी या प्रकरणी व्यवस्थापन आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बैठकीत तोडगा निघाला नसल्याने मंगळवारी कंपनीच्या प्रशासनासोबत संचालक मंडळाची बैठक झाली होती. तातडीचा उपाय म्हणून १५०० कोटी रुपये उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र हे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर जेट एअरवेज तात्पुरती बंद करण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय. हवाई वाहतूक विभागाचे सचिव प्रदीप सिंग खरोला यांनी सांगितले की, जेट एअरवेजच्या प्रशासनाचा निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू असून पाच विमानांसह त्यांची देशांतर्गत सेवा अद्याप सुरू आहे. जेटने आंतरराष्ट्रीय उड्डाणे १८ एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.

http://wtf2.forkcdn.com/www/delivery/lg.php?bannerid=0&campaignid=0&zoneid=6010&loc=http%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fmumbai%2Fjet-airwayss-bid-funding-rs-400-crore-demand%2F&referer=http%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fmumbai%2Fpage%2F2%2F&cb=d698b55380जेट एअरवेजचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष नरेश गोयल यांनी दुसऱ्या कंपनीच्या माध्यमातून जेटसाठी बोली लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला विरोध झाल्यानंतर त्यांनी प्रक्रियेमधून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. जेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी बँकांनी जेटला वाचविण्यासाठी ४०० कोटी देण्याची मागणी केलीय.

मागे

लाव रे तो व्हिडिओ... सोशल नेटवर्किंगवर अनेक पोस्ट...
लाव रे तो व्हिडिओ... सोशल नेटवर्किंगवर अनेक पोस्ट...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष लोकसभा निवडणुका&n....

अधिक वाचा

पुढे  

टीटीव्ही दिनाकरन यांच्या कार्यालयावर छापा; 4 कार्यकर्त्यांना अटक
टीटीव्ही दिनाकरन यांच्या कार्यालयावर छापा; 4 कार्यकर्त्यांना अटक

लोकसभा निवडणुकीच्या काळात काळ्या पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी निवडणूक आयो....

Read more