By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 13, 2019 11:20 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तेसाठीचा घोळ पाहून झारखंडमध्ये लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार्या निर्णय घेतलाय. त्याचबरोबर नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडनेही (जेडीयू) स्वबळावर निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे. पासवान आणि नितीश कुमार यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन भाजपाला धक्का दिला आहे.
लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी आपले पुत्र खासदार चिराग पासवान यांच्याकडे पक्षाची जबाबदारी सोपीवली आहे. लोक जनशक्ती पक्ष हा भाजपप्रणीत एनडीएतील घटक पक्ष आहे. झारखंड मध्ये विधानसभेची निवडणूक 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत होतेय. झारखंड विधानसभेची सदस्य संख्या 81 असून या निवडणुकीचा निकाल 23 डिसेंबर रोजी लागणार आहे. लोक जनशक्ती पक्ष 50 जागांवर निवडणूक लढविणार आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरीही शिवसेना, काँग्रेस आणि र....
अधिक वाचा