By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 06, 2020 01:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हल्ल्यानंतर २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली असल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जेएनयूतील हल्ला प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्यातील विद्यार्थी सुरक्षित असून त्यांनी काळजी करू नये असेही उद्धव यांनी म्हटले.
जेएनयूतील विद्यार्थ्यांवर रविवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर देशभरात रोष व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आज मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, मुंबईत आज दुपारी चार वाजता हुतात्मा चौकात अभाविपच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यात 20 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विद्यार्थी, संघटनांचे नेते आणि शिक्षकांचाही समावेश आहे. जखमींना उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत विद्यापीठाच्या अनेक दालनांची मोडतोड करण्यात आली आहे.
रत्नागिरी - तंत्रशिक्षण आणि राज्यातले नवनियुक्त उच्च मंत्री उ....
अधिक वाचा