By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 29, 2019 04:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
वडाळा विधानसभा मतदारसंघांचे कॉंग्रेसचे आमदार कालिदास कोलंबकर यांनी आज कॉँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुपूर्द केला. आता ते बुधवारी 31 जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे कळते. त्याचबरोबर उद्या मंगळवारी कोळंबकर आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे देणार आहेत.
कालिदास कोळंबकर 7 वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. ते नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. नारायण राणे सोबतच त्यांनी शिवसेना सोडून कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला होता. राणेंसोबत आलेले सर्व आमदार शिवसेनेत परतले. पण कोळंबकर कॉंग्रेसमधेच राहिले आता ते भाजपात प्रवेश करणार आहेत.
महाराष्ट्रात काही दिवसांतच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीव....
अधिक वाचा