By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 06:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
राजस्थानचे राज्यपाल हे आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. निवडणूक आयोगाने या प्रकरणी राष्ट्रपतींना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गृह मंत्रालयाला पत्र पाठवले असून राज्यपालांनी राजकारणापासून दूर राहिले पाहिजे अशी तंबी दिली आहे.
राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनी मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे असे वक्त्यव्य केले होते. राज्यपाल या पदावरील व्यक्ती कुठल्याही पक्षाची नसते. त्या व्यक्तीने तटस्थ राहणे अपेक्षित असते. परंतु आपण भाजपचे कार्यकर्ते आहोत, मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे असे वक्तव्य राज्यपाल कल्याण सिंह यांनी केले. यावरून निवडणूक आयोगाने तपास करून कल्याण सिंह यांना दोषी ठरवले आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसने कल्याण सिंह यांचा राजीनामा मागितला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी कल्याण सिंह यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्यात सभा घेणार असल्याचे व....
अधिक वाचा