By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 24, 2019 12:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : bangalore
गेले काही दिवस कर्नाटक मध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष अखेर काल संपुष्टात आला. विधानसभेत बहुमत गमावल्यानंतर कुमारस्वामी यांनी राज्यपाल वाजुभाई वाडा यांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजपचे विधिमंडळ पक्षनेते बी.एस.येडुयुरप्पा उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे म्हटले जात आहे.
केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनीही कर्नाटकात भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती दिली. कर्नाटकात येडियुरप्पा हेच मुख्यमंत्रीपदाचे आमदार आहेत त्याबाबत केंद्रीय नेतृत्वाच्या मनात कोणतेही दुमत नाही, असेही गौडा यांनी नमूद केले आहे. दरम्यान भाजपच्या सर्व आमदारांची बैठक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतरच आम्ही राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहोत, असे येडियुरप्पा यांनी सांगितले.
आंध्र प्रदेशच्या स्थानिक नोकऱ्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के आरक्षण राज्यात....
अधिक वाचा