ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘कर्ता’ आणि ‘करविता’ एकत्र येणे स्वाभविक; भाजपाचा शरद पवार- राज ठाकरे यांना टोला

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 16, 2019 01:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

‘कर्ता’ आणि ‘करविता’ एकत्र येणे स्वाभविक; भाजपाचा शरद पवार- राज ठाकरे यांना टोला

शहर : सोलापूर

सोलापूर येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी मोदीवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.  या सभेनंतर राज यांच्या भाषणासोबत एक वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. हॉटेलमध्ये राज ठाकरेंचा मुक्काम होता, त्याच हॉटेलमध्ये शरद पवार हेही थांबले आहेत. त्यावरुन, भाजपाने राज ठाकरेंवर टीका केली आहे. सोलापूर दौर्‍यावेळी राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्याच हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही त्याच दिवशी उतरले होते. राज ठाकरेंचा सोलापूर तर शरद पवार यांचा उस्मानाबाद दौरा एकाच दिवशी होता. विशेष म्हणजे एकाचवेळी दोन्ही नेत्यांच्या सभा शेजारील जिल्ह्यात झाल्या. हीच संधी साधून भाजपने ट्विटरवरून गंगाधर ही शक्तिमान है अशी कॅप्शन देऊन  राज ठाकरे आणि शरद पवांराना खोचक चिमटा काढला आहे. 
राज आणि पवार यांच्या एकाच हॉटेलमध्ये थांबल्याची बातमी समजाताच भाजपाने राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. ’कर्ता’ आणि ’करविता’ यांनी एकत्र येणे अगदीच स्वाभाविक असे म्हणत शरद पवार गाडीतून उतरले असल्याचा फोटो शेअर केला आहे. 

मागे

“ए लाव रे तो व्हिडीओ”; राज ठाकरे आज कोल्हापुरात  काय दाखवणार?
“ए लाव रे तो व्हिडीओ”; राज ठाकरे आज कोल्हापुरात काय दाखवणार?

आज कोल्हापुरात राज यांची भाजपविरोधी प्रचारसभा होत आहे. राज ठाकरेंच्या या स....

अधिक वाचा

पुढे  

रात्री सव्वादोन वाजता मोदी म्हणाले,“दादा बिटिया गिरनी चाहिए”
रात्री सव्वादोन वाजता मोदी म्हणाले,“दादा बिटिया गिरनी चाहिए”

महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी साताऱ्यातील वाईच्या सभेत,....

Read more