ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

स्व:खर्चाने खड्डे बुजवल्याशिवाय राहणार नाही, केडीएमसीतील अपक्ष नगरसेवकाचा निर्धार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2020 06:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

स्व:खर्चाने खड्डे बुजवल्याशिवाय राहणार नाही, केडीएमसीतील अपक्ष नगरसेवकाचा निर्धार

शहर : kalyan

दरवर्षी कल्याण-डोंबिवलीत पावसाळ्यात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यातील खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहे. मात्र तरीही प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी स्वखर्चाने खड्डे बुजवण्याचे काम सुरु केले आहे. कर्जबाजारी झालो तरी चालेल, मात्र स्व:खर्चाने खड्डे बुजवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार केला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात खड्डयामुळे नागरिक त्रस्त आहे. गेल्या काही दिवसात अनेक अपघात झाले आहेत. वारंवार तक्रारी करुन सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही. कल्याण ग्रामीणमधील काही भाग यापूर्वी महापालिका हद्दीत येत होता. मात्र आता वगळेल्या गावात त्याचा समावेश झाला आहे. त्यामुळे या नव्या भागाची नव्याने नगरपरिषद स्थापन करण्यात आली आहे.

मात्र सध्या या भागाकडे पालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. याचा फटका त्या भागाला सहन करावा लागत आहे. या ठिकाणी दररोज अनेक अपघात घडत असतात. त्यामुळे कित्येक जण जखमी झाले आहे. मात्र तरीही याबाबत काहीही कारवाई करण्यात आलेली नाही.त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी स्व: खर्चाने खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी कजर्बाजारी झालो तरी चालेल. मात्र नागरिकांसाठी रस्ते खड्डेमुक्त करु, असा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे आता तरी महापालिकेला जाग येईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मागे

मुलींवर योग्य संस्कार नसल्यानं बलात्कार, भाजप आमदाराची मुक्ताफळं
मुलींवर योग्य संस्कार नसल्यानं बलात्कार, भाजप आमदाराची मुक्ताफळं

सध्या उत्तरप्रदेशमधील हाथरस, बलरामपूरमध्ये अत्याचाराच्या घटनांनी देशभरा....

अधिक वाचा

पुढे  

मराठा वकिलांची फौज आंदोलनात हवीच, सरकारला जाब विचारा, कोल्हापुरात संभाजीराजे आक्रमक
मराठा वकिलांची फौज आंदोलनात हवीच, सरकारला जाब विचारा, कोल्हापुरात संभाजीराजे आक्रमक

मराठा आरक्षणाच्या लढ्यात ठराविक वकिलांवर भर देण्यात येऊ नये, मराठा वकिलांच....

Read more