By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: मार्च 31, 2019 11:52 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
ईशान्य मुंबईचे भाजप खासदार किरीट सोमय्या हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा या निवासस्थानी दाखल झाले आहेत. तर, सोमय्या यांना तिकीट देण्यास शिवसेनेचा विरोध आहे. याचं पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची होणार आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसैनिकांनी एकच स्पीरीट नो किरीट हा नारा दिला आहे. प्रथम मातोश्रीवरुन सोमय्या यांची भेट नाकारली त्यानंतर शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी सोमय्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं आहे. या सर्व घडामोडींवरून ईशान्य मुंबईतील भाजपचा उमेदवार मातोश्रीवरूनच ठरणार हे नक्की झाले. काही दिवसांपूर्वी मातोश्रीने किरीट सोमय्या यांची भेट नाकारली त्यानंतर सुनिल राऊत यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्याने सोमय्या यांना उमेदवारी दिली होती, तर त्यांचा पराभव होईल अशी शक्यता आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किरीट सोमय्या यांच्या बाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मिळून घेणार असल्याचे समजते.
चंद्रपूर काँग्रेस लोकसभा उमेदवार बाळू धाणोरकर यांच्या प्रचारासाठी राहुल ....
अधिक वाचा