ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपाच्या वाटेवर?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 12:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपाच्या वाटेवर?

शहर : कोल्हापूर

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काल त्यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. महाडिक यांचे कार्यकर्ते भाजपा प्रवेशाबाबत दबाव आणत आहेत, त्या पार्श्वभूमीवर या घडामोडी घडत आहेत.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा पराभव केला. उल्लेखनीय म्हणजे, धनंजय महाडिक यांनी २०१४ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा ३३,५४२ मतांनी पराभव केला होता.

परंतु, कोल्हापुरात आघाडीत-बिघाडी झाली... आणि काँग्रेसच्या सतेज पाटलांनी युतीचे उमेदवार असलेल्या संजय मंडलिकांचा प्रचार सुरू केला. याच धर्तीवर पाटील समर्थकांनी 'आमचं ठरलंय' ही मोहीमही सुरू केली होती. ही मोहीम लोकसभा निवडणुकीच्या काळात चांगलीच गाजली... आणि त्याचा परिणामही लोकसभा निकालात दिसून आला.

मागे

“माझ्या मुलासारखंच तूही काम कर”, धैर्यशील मानेंना  राजू शेट्टींच्या आईचा आशीर्वाद
“माझ्या मुलासारखंच तूही काम कर”, धैर्यशील मानेंना राजू शेट्टींच्या आईचा आशीर्वाद

कोल्हापुरातल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातले शिवसेनेचे नवनिर्वाचित खा....

अधिक वाचा

पुढे  

निवडणूक निकालानंतर  पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याचे सत्र सुरुच
निवडणूक निकालानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याचे सत्र सुरुच

पेट्रोलच्या किंमती वाढण्याचे सत्र मंगळवारी सलग पाचव्या दिवशीही सुरु राही....

Read more