By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 19, 2019 01:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्याच्या सत्तास्थापनेचा तिढा काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना या महासेनाआघाडीभोवती फिरत आहे. राज्याला नवा सरकार कधी मिळणार हा प्रश्न अद्याप कायम असताना,कोल्हापुरात महासेनाआघाडीने पहिला विजय मिळवला आहे. कारण कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड सूरमंजिरी लाटकर यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांची गेल्या चार वर्षापासून इथे आघाडी आहे.
सूरमंजिरी लाटकर या कोल्हापूरच्या 49 व्या महापौर ठरल्या आहेत. लाटकर यांनी भाजपच्या भाग्यश्री शेटके यांचा 11 मतांनी पराभव केला. महापौर- उपमहापौर निवडीला शिवसेनेचे चार नगरसेवक अनुपस्थित होते. गेल्या चार वर्षापासून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेत ताराराणी आघाडीच्या माध्यमातून माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व होतं. मात्र पक्षीय राजकारण आल्यानंतर काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी आघडीची मोट बांधत सत्ता संपादन केली आहे. त्याला शिवसेनेचीही साथ मिळाली आहे.
सूरमंजिरी लाटकर नव्या महापौर
कोल्हापूर महानगरपालिकेत महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सूरमंजिरी लाटकर यांचे नाव निश्चित करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नगरसेवकांची बैठक शासकीय विश्रामधाम येथे पार पडली होती. या बैठकीत लाटकर यांच्या नावाला एकमताने मंजुरी देण्यात आली होती.
कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सत्ता फॉर्मुला यशस्वी झाला, तसाच तो राज्यातही होईल असा विश्वास यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला होता. आज महापौरपदाची निवडणूक होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना व्हीप लागू करण्यात आला होता. तसंच सर्वांना सहलीसाठी बाहेर पाठवण्यात आलं होतं.
कोल्हापूर महापालिकेचा इतिहास
1978 मध्ये कोल्हापूर महापालिकेची स्थापना झाली.
नारायण धोंडीराम जाधव हे कोल्हापूरचे पहिले महापौर होते.
1978 पासून आतापर्यंत 48 महापौरांनी कार्य़भार सांभाळला
गेल्या 10 वर्षात 14 महापौर करवीरवासियांनी पाहिले
2018 पासून आतापर्यंत तब्बल 4 महापौर बदलण्यात आले आहेत.
महापौरपदाबरोबरच आता स्थायी समिती सभापतीपदाच्या खांडोळीचाही प्रघात मागच्या वर्षीपासून पडला आहे.
एका बाजुला सत्तास्थापनेचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना खासदार संजय र....
अधिक वाचा