By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 12:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : कोल्हापूर
कोल्हापुरातल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातले शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने हे आज अचानक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या घरी दाखल झाले. राजू शेट्टी यांच्या पत्नीनं औक्षण करुन धैर्यशील मानेंना घरात घेतलं. तर माने यांना फेटा बांधून राजू शेट्टींनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांच्या आईचा आशीर्वाद घेतला.खासदार माने यांनी अचानक राजू शेट्टी यांच्या घरी भेट दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. लोकसभा निवडणुकीत धैर्यशील माने राजू शेट्टी यांचा तब्बल १ लाख ४ हजार मतांनी पराभव केला होता.धैर्यशील माने यांनी पायाला हात लावत राजू शेट्टींच्या आईचा आशीर्वाद घेतला. यावेळी, 'माझ्या मुलानं जसं काम केलं तसं तूही कर' असा आशीर्वाद राजू शेट्टींच्या आईनं धैर्यशील मानेंना दिला.
लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाला सात दिवस उलटले तरी काँग्रेसच्या अध्यक्षपदा....
अधिक वाचा