ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर हजर राहण्यासाठी पवारांना समन्स

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 18, 2020 12:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर हजर राहण्यासाठी पवारांना समन्स

शहर : मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगसमोर साक्ष होणार आहे. यासाठी आयोग शरद पवार यांना ४ एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावणार आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळत पवारांना आयोगासमोर हजर रहावं लागणार आहे. ही हजेरी टाळता येणार नाही. आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी ही माहिती दिली आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणात प्रतिज्ञापत्र दाखल केलेले सागर शिंदे यांनी पवारांची आयोगाने साक्ष घ्यावी, असा अर्ज आयोगासमोर केला होता.

 

आयोगाने यापूर्वी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना कोरेगाव भीमा प्रकरणात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी गेल्या वर्षी नोटीस पाठवली होती. त्यावेळी केवळ राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं.

मात्र आता शरद पवारांनी उघड केलेली काही माहिती ती प्रतिज्ञापत्रात नव्हती. प्रामुख्याने संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यामुळे कोरेगाव भीमाची दंगल घडल्याचं वक्तव्य केलं होतं.

शरद पवारांकडे असलेली जादा माहिती आयोगासमोर यावी म्हणून पवारांना साक्षीसाठी बोलवावं अशी मागणी सागर शिंदे यांनी केली होती. त्यावर सुनावणी करताना आपण शरद पवारांना साक्षीसाठी बोलवणारच आहोत, असे आयोगाने सांगितले होते.

जेव्हा पवार साक्षीसाठी येतील तेव्हा तुम्ही तुमच्या अर्जातील प्रश्न उपस्थित करू शकता, असेही आयोगाने तेव्हा म्हटले होते. त्यानुसार आता आयोगाने पवारांना साक्षीसाठी बोलवलं आहे. या साक्षीत पवार काय नवीन माहिती देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

मागे

मध्यप्रदेशात 'कमलनाथ' की 'कमळ'?, आजच्या घडामोडींकडे लक्ष
मध्यप्रदेशात 'कमलनाथ' की 'कमळ'?, आजच्या घडामोडींकडे लक्ष

मध्यप्रदेशात सत्तासंघर्ष सुरु आहे. सोमवारी भाजप आमदारांना पुन्हा एकदा विम....

अधिक वाचा

पुढे  

फ्लोअर टेस्टपूर्वीच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा राजीनामा; भाजपने जनतेला दगा दिल्याचा आरोप
फ्लोअर टेस्टपूर्वीच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा राजीनामा; भाजपने जनतेला दगा दिल्याचा आरोप

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी फ्लोअर टेस्ट होण्यापूर्वीच राजीना....

Read more