ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ऑलंम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी कृष्णा पूनिया देणार राजवर्धन राठोड यांना टक्कर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 02, 2019 06:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ऑलंम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी कृष्णा पूनिया देणार राजवर्धन राठोड यांना टक्कर

शहर : nimbahera

भाजपने लोकसभा २०१९च्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून ऑलंम्पिक खेळाडू राजवर्धन राठोड यांना उमेदवारी दिली आहे. आता काँग्रेसने राजवर्धन राठोड यांना टक्कर देण्यासाठी तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. ऑलिंम्पिक पदक विजेती कृष्णा पूनिया हिला जयपूर ग्रामीणमधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत ३२५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपचे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या विरोधात काँग्रेसकडून ऑलिम्पियन खेळाडू  कृष्णा पूनियाला जयपूर ग्रामीणमध्ये लोकसभा उमेदवारी देण्यात आली आहे.

कृष्णा पूनियाने ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये थाळीफेक प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. २०१०मध्ये दिल्लीत झालेल्या ऑलंम्पिक स्पर्धेत कृष्णा पूनियाने थाळीफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. कृष्णा पूनिया सध्या राजस्थानच्या सादुलपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. कृष्णा पुनियाची थेट लढत राज्यवर्धन राठोड यांच्याशी होणार आहे. ऑलिम्पिक पदक विजेते राज्यवर्धन राठोड केंद्र सरकारमध्ये क्रीडा व युवककल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) आहेत. ते जयपूर ग्रामीणचे खासदार आहेत. काँग्रेसने सोमवारी जाहीर केलेल्या यादीमध्ये सहा राजस्थानचे, दोन महाराष्ट्र आणि एक गुजरातचा उमेदवार आहे.

मागे

...तर मी राजकारणातून निवृत्त होईन - : अजित पवार
...तर मी राजकारणातून निवृत्त होईन - : अजित पवार

मावळ येथील गोळीबारासंदर्भात माझ्या विरोधात कोणतेही संभाषण विरोधकांकडे अस....

अधिक वाचा

पुढे  

योगींच्या 'मोदी की सेना' विधानानं वाद; माजी नौदल प्रमुखांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
योगींच्या 'मोदी की सेना' विधानानं वाद; माजी नौदल प्रमुखांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

भारतीय लष्कराला मोदी की सेना म्हणणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदि....

Read more