By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 03, 2020 07:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मोदी सरकारच्या कामगारविरोधी आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात ८ जानेवारी रोजी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने देशव्यापी संप आणि आंदोलनाची हाक दिली आहे. विशेष म्हणजे डाव्यांच्या या संपामध्ये शिवसेनेची भारतीय कामगार सेना देखील सहभागी होणार आहे. या संपाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी उपस्थिती लावली.
कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांची शुक्रवारी मुंबई पत्रकार संघात संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांसोबत शिवसेना नेते संजय राऊतही एकाच मंचावर उपस्थित होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेनंतर आता डाव्या पक्षांसोबत देशव्यापी संपात शिवसेना सहभागी होणार.
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “मोदी सरकार देशातील जनतेला २ कोटी नोकऱ्या देणार होते. मात्र, प्रत्यक्षात ५ कोटी नोकऱ्या गेल्या आहेत. रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत करणार होते पण १ लाख ६७ हजार कोटी रुपये रिझर्व्ह बँकेकडून ओरबाडले गेले.”
८ जानेवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी संपात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी या राजकीय पक्षांच्या संलग्न कामगार संघटना तसेच सेन्ट्रल स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई फेडरेशन, सर्व बँका, एलआयसी, जीआयसी, पोर्टट्रस्ट, डिफेन्स, सिव्हिल एव्हिएशन, बीएसएनएल, एमटीएनएल, बीपीसीएल आणि एचपीसीएल या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्याच्या कामगार संघटनाही सहभागी होणार आहेत.
गरीब आणि गरजूंना फक्त १० रुपयांत जेवणाची थाळी देणाऱ्या 'शिवभोजन' यो....
अधिक वाचा