By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 28, 2020 09:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
फेसबुकवर जाहिरातीसाठी खर्च करणाऱ्यांविषयी नवी आकडेवारी समोर आली आहे. यानुसार, मागील 18 महिन्यांमध्ये सत्ताधारी भाजपने फेसबुक जाहिरातीवर सर्वाधिक खर्च केला आहे. यात सामाजिक, राजकीय आणि निवडणूक प्रचार इत्यादी जाहिरातींचा समावेश आहे. फेब्रुवारी 2019 पासून भाजपने फेसबुक जाहिरातीवर 4.61 कोटी रुपये खर्च केले आहेत.
फेसबुकवर जाहिरातीसाठी खर्च करणाऱ्यांच्या यादीत भाजपनंतर इतर पक्षांचंही नाव आहे. देशाचा सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसने फेसबुक जाहिरातीवर 1.84 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर आम आदमी पक्षाने (AAP) फेसबुक जाहिरातीवर 69 लाख रुपयांचा खर्च केला आहे. सोशल मीडियावर जाहितीवर खर्च करणाऱ्यांच्या माहितीचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने ही आकडेवारी जाहीर केली आहे. यावर 24 ऑगस्टपर्यंतचे आकडेवारी उपलब्ध आहे. आ आकडेवारीनुसार फेसबुक इंडियावर फेब्रुवारी 2019 पासून 59.65 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च करण्यात आले आहेत.
टॉप 10 पैकी 4 जाहिरातदार भाजपशी संबंधित
ऑनलाइन मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेसबुकवर जाहिरातीवर खर्च करणारे टॉप 10 पैकी 4 जाहिरातदार भाजपशी संबंधित आहेत. यामध्ये 3 जण असे आहेत ज्यांचा पत्ता भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयाचा आहे. या चार पैकी जाहिरात देणारे दोन जाहिरातदार कम्युनिटी पेज आहेत. ‘मेरा पहला वोट मोदी को’ आणि ‘भारत के मन की बात’ अशी या पेजची नावं आहेत. ‘मेरा पहला वोट मोदी’च्या जाहिरातीवर 1.39 कोटी रुपये आणि ‘भारत के मन की बात’च्या जाहिरातीवर 2.24 कोटी रुपए खर्च करण्यात आले आहेत.
परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील ब....
अधिक वाचा