By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 27, 2019 03:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या शिवतीर्थावर म्हणजेच दादरच्या शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे निश्चित झाले आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरेंना शपथ घेण्यापासून रोखा, अशी मागणी करणारी एक याचिका हिंदू महासभेचे नेते प्रमोद जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. मात्र न्यायालयाने या याचिकेवर सुनावणीस करण्यास नकार दिला आहे. म्हणजेच ती याचिका फेटाळली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना रोखण्याचा अखेरचा प्रयत्नही फसल्याचे दिसून येत आहे.
प्रमोद जोशी यांनी दाखल केलेल्या याचिकेत, उद्धव ठाकरे यांनी युती तोडून नव्या आघाडीचं सरकार बनवणं ही मतदारांची फसवणूक आहे. त्यामुळे त्याना शपथ घेण्यापासून रोखावं अशी मागणी केली होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ....
अधिक वाचा