ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विनोद तावडे यांना आपल्या गाडीत बसण्याची एक संधी द्या.मनसेचे राजनाथ सिंह यांना उपरोधक पत्र

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 17, 2019 06:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विनोद तावडे यांना आपल्या गाडीत बसण्याची एक संधी द्या.मनसेचे राजनाथ सिंह यांना उपरोधक पत्र

शहर : मुंबई

मनसेने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर निशाना साधला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आपल्या गाडीत बसण्याची एक संधी द्या....मनसेचे राजनाथ सिंगांना पत्र अश्या आशयाचे मनसेचे नवी मुंबई शहर प्रमुख गजानन काळे यांनी पोस्ट लिहिली आहे. तर यामध्ये त्यांनी उपरोधक असे पत्र लिहिले आहे. यामध्ये विनोद तावडे यांना तुमच्या गाडीत बसू द्या अशी मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज्यात भाजपा आणि मोदींविरुद्ध सूर आळवण्यात येत आहे. आतापर्यंत राज ठाकरेंच्या तीन राजकीय सभा पार पाडल्या आहेत.या सभांमधून राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर राजकीय स्ट्राईक केला. त्यामुळे भाजपाने सुद्धा त्यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथून परतत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी खास चर्चा करण्यासाठी त्यांच्या हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला सोलापूरच्या एका हॉटेलमध्ये दोघांची चर्चा झाली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या टूरिंग टॉकिजची पुढची स्क्रिप्ट शरद पवार यांनी त्यांना दिली असावी, असा आरोप विनोद तावडे यांनी सोमवारी पत्रकारपरिषदेत केला. राज ठाकरे कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत हे मनसेने जाहीर करावे, असे आवाहनही तावडे यांनी केले. तावडेंच्या या टीकेनंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी तावडेंना लक्ष्य केलं आहे. या पूर्वी जेव्हा एकदा विनोद तावडे हे राजनाथसिंह यांना भेटले होते तेव्हा त्यांच्या सोबत गाडीत बसायला गेले होते त्यावेळी राजनाथसिंह यांच्या सुरक्षा रक्षकाने त्यांना अडवले होते. हाच धागा पकडून मनसेने तावडे यांच्यावर निशाना साधला आहे.

मागे

अहमदनगरमध्ये बेकायदा दारु विक्री करणार्‍यांवर धडक कारवाई
अहमदनगरमध्ये बेकायदा दारु विक्री करणार्‍यांवर धडक कारवाई

सध्या लोकसभा निवडणूकीचा जोरदार प्रचार सुरु असताना निवडणूकीच्या काळात बेक....

अधिक वाचा

पुढे  

देशात नोटबंदी मग भाजपाकडे इतका पैसा आला कोठून - राज ठाकरे
देशात नोटबंदी मग भाजपाकडे इतका पैसा आला कोठून - राज ठाकरे

देशात अचानक नोटबंदी घोषणा करताना आरबीआयला देखील माहित नव्हते, ना केंद्रीय ....

Read more