By Anuj Kesarkar | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2019 01:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सोनपेठ:-तालुक्यातील गोदाकाठच्या गावांनी रस्त्यासाठी मतदान न करण्याचा निर्धार महापंचायतीचे आयोजन करुन घेतला होता .दि २१ रोजी विधानसभेच्या निवडणूकीसाठी रात्रीच मतदान पथके गावात दाखल झाली होती .मतदान होणार का नाही या बद्दल जिल्हाभरात मोठी चर्चा होती .गावातील तरुणांनी रात्री गावात घरोघर रस्त्यासाठी मतदान न करण्याचे आवाहन केले .राष्ट्रपुरुषांच्या व देवी देवतांच्या समोर मतदान न करण्याची प्रतिज्ञा युवकांनी केली .सकाळ पासुनच सर्व मतदान केंद्राजवळ युवक जमा झाले पण एकही मतदार मतदान केंद्राकडे फिरकला नसल्याने मतदान झाले नाही .संध्याकाळी मतदान संपल्यानंतर गावकऱ्यांनी ऐकी कायम ठेऊन कुणीच मतदान न केल्याने फटाके फोडुन आनंद व्यक्त केला .मतपेट्या नेण्यासाठी आलेल्या वाहानांची हारतुरे घालुन मिरवणूक काढली .या बहिष्कारावर प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरीकांनी करत प्रशासनावर रोष व्यक्त केला .या बहिष्कारात गोदाकाठची लासीना,थडी उक्कडगाव, वाडी पिंपळगाव,थडी पिंपळगाव, गंगापिंपरी, गोळेगाव, लोहीग्राम, खरपी तांडा या गावातील नागरीक सहभागी झाले होते .गोदाकाठचा रस्ता पुर्ण होई पर्यंत आंदोलन तीव्र करणार असल्याचा ईशारा ही या नागरीकांनी यावेळी दिला आहे. आठ गावातील एकही मतदार मतदान केंद्रावर फिरकला सुध्दा नाही .
जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यापासून अस्वस्थ झालेला पाकिस्तानने आज पुन्....
अधिक वाचा