By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 11:35 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भाजपच्या पूनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यातील लढतीमुळे उत्तर-मध्य मुंबईचा मतदारसंघ लक्षवेधी ठरला आहे. गेल्या निवडणुकीत पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा १,८६,७७१ मतांनी पराभव केला होता. मात्र, मोदी लाट ओसरल्यामुळे पूनम महाजन यांच्यासाठी यंदाची लढत कठीण मानली जात आहे. या मतदारसंघात यंदा ५२.८४ टक्के इतके मतदान झाले आहे.
कुर्ला, वांद्रे ते विलेपार्ले असा संमिश्र वस्तीचा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जायचा. मात्र, २०१४ मध्ये मोदी लाटेमुळे या मतदारसंघातील समीकरणे बदलली होती. वेळी भाजपची पाळेमुळे या मतदारसंघात रुजलेली नव्हती. मात्र त्यानंतर झालेली विधानसभा व महापालिका निवडणुकीत संघटनेची मतदान केंद्र पातळीपर्यंत नीट बांधणी करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान त्यांच्या मतदारसंघात असून महाजन-ठाकरे घराण्याच्या कौटुंबिक संबंधांमुळे शिवसेना-भाजप युतीचा लाभ त्यांना मिळू शकेल. या तुलनेत गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर प्रिया दत्त मतदारसंघात फारशा फिरकल्या नव्हत्या. ही बाब त्यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते.
उत्तर मध्य मुंबईत पूनम महाजन १७०७६ मतांनी आघाडीवर
* उत्तर-मध्य मुंबईत पूनम महाजन ८०६३ मतांनी आघाडीवर
* उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन यांनी आघाडी
* थोडयाच वेळात मतमोजणीला होणार सुरुवात
यंदा शिवसेनेने दक्षिण-मध्य मुंबईतून पुन्हा एकदा राहुल शेवाळे यांना उमेदवा....
अधिक वाचा