By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 11:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
यंदा शिवसेनेने दक्षिण-मध्य मुंबईतून पुन्हा एकदा राहुल शेवाळे यांना उमेदवारी दिली आहे. राहुल शेवाळे यांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांचा १,३८,३४२ मतांनी पराभव केला होता. २०१४ च्या निवडणुकांमध्ये या मतदारसंघात ५३.०९ % इतकं मतदान झालं होतं. तर, यंदाच्या वर्षी हा आकडा ५५.३५ % इतका आहे. त्यामुळे आता हा वाढीव आकडाच निर्णायक ठरणार आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने मुंबईतील सहाच्या सहा मतदारसंघांमध्ये विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीतही राहुल शेवाळे यांना युतीचा फायदा होऊ शकतो. या मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत मोठी विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे मतदार आपल्याच बाजूने कौल देतील, असा त्यांना विश्वास वाटतो. तर राहुल गांधी यांची मुंबई झालेली सभा आणि झोपडपट्टीवासीयांना व चाळीतील रहिवाशांना ५०० चौरस फुटांची घरे देण्याच्या घोषणेमुळे काँग्रेसमध्ये उत्साह संचारला होता. याचा फायदा त्यांना निवडणुकीत मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
* राहुल शेवाळे यांना ७२, ९३५, एकनाथ गायकवाड यांना ४२,२९० आणि वंचित बहुजन आघाडीच्या संजय भोसले यांना १२,४९० मते
* दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून राहुल शेवाळे १९५९७ मतांनी आघाडीवर
* दक्षिण-मध्य मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे २५ हजार मतांनी आघाडीवर
* राहुल शेवाळे यांना ३७, ३७३ मते आणि एकनाथ गायकवाड यांना २१,८०० मते
* शिवसेनेचे राहुल शेवाळे ११,८१८ मतांनी आघाडीवर
* दक्षिण-मध्य मुंबईत शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांना १६,०७० आणि एकनाथ गायकवाड यांना ७८३३ मते
शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलि....
अधिक वाचा