ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Election results 2019 : दक्षिण मुंबईत अरविंद सावंत २३ हजार मतांनी आघाडीवर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 11:24 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Election results 2019 : दक्षिण मुंबईत अरविंद सावंत २३ हजार मतांनी आघाडीवर

शहर : मुंबई

शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यातील लढतीमुळे दक्षिण मुंबई मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कुलाबा, नरिमन पॉइंटचा उच्चभ्रू परिसर ते वरळी, शिवडीपर्यंत हा मतदारसंघ पसरलेला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये अरविंद सावंत यांना मतदारसंघातील विकासाचे प्रश्न मार्गी लावता आले नव्हते. त्यामुळे यंदाची लढत त्यांच्यासाठी काहीशी अवघड मानली जात आहे. भाजपशी युती झाल्यामुळे अरविंद सावंत यांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी त्यांची मुख्य भिस्त मराठी, गुजराती-मारवाडी-जैन मतदारांवर आहे. 

तर दुसरीकडे मिलिंद देवरा यांनाही राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी पर्यूषण पर्वात मांसाहाराचे समर्थन करणाऱ्या शिवसेनेला धडा शिकवण्याची भाषा करत जैन मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला होता. हे भावनिक आवाहन यशस्वी ठरल्यास जैन मतदार काँग्रेसकडे वळू शकतो. याशिवाय, रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मिलिंद देवरा यांना दिलेला पाठिंबाही चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे कुलाबा, नरिमन पॉईंट या भागातील उच्चभ्रू मतदारही देवरा यांच्या पाठिशी उभा राहू शकतो. 

                  

मागे

ईव्हीएममध्ये फेरफार शक्य नाही, मात्र अशी यंत्रणा बसवलीय का? - पृथ्वीराज चव्हाण
ईव्हीएममध्ये फेरफार शक्य नाही, मात्र अशी यंत्रणा बसवलीय का? - पृथ्वीराज चव्हाण

लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या २३ मे रोजी लागणार आहेत. त्याआधी देशातील जवळप....

अधिक वाचा

पुढे  

Election results 2019 : दक्षिण-मध्य मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे २५ हजार मतांनी आघाडीवर
Election results 2019 : दक्षिण-मध्य मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे २५ हजार मतांनी आघाडीवर

यंदा शिवसेनेने दक्षिण-मध्य मुंबईतून पुन्हा एकदा राहुल शेवाळे यांना उमेदवा....

Read more