ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

किरीट सोमय्यांची व्हिडीओ क्लिप व्हायरल निवडणूक आयोगाकडे तक्रार

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 14, 2019 03:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

किरीट सोमय्यांची व्हिडीओ क्लिप व्हायरल निवडणूक आयोगाकडे तक्रार

शहर : मुंबई

जसजशा निवडणुकां तोंडावर येत आहेत तसतशी उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा जोर वाढताना दिसत आहेत. त्यात एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या देखील लढविल्या जात आहेत. उत्तर-पूर्व मुंबईतून भाजपाकडून किरीट सोमय्या यांना तिकीट नाकारल्यानंतर किरीट सोमय्या नाराज असल्याची अफवा विरोधी पक्षांतर्फे उठवण्यात असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. मनोज कोटक यांचा प्रचार करताना किरीट सोमय्या यांनी केलेल्या विधानाची व्हिडीओ क्लिप एडिट करून व्हायरल करण्यात आल्याचेही ते म्हणाले. किरीट सोमय्या हे राष्ट्रवादीच्या उमेदवार संजय भाऊचा प्रचार करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय.  किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून निवडणूक आयोगाला तसेच मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला या संदर्भात तक्रार दिलीय. ह्या व्हिडीओ क्लिपमध्ये किरीट सोमय्या हे भाऊ हा माझ्यापेक्षा जास्त काम करतो अशा प्रकारचं विधान करताना दिसत आहेत. दरम्यान अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करून राष्ट्रवादीने भ्रमात राहू नये अशी टीका सोमय्या यांनी केलीय. 29 तारखेला जनता तुमचा भ्रम मोडून काढेल असेही ते म्हणाल. तर हा व्हिडीओ आम्ही बनविला नसून ज्या माणसाला पक्षाने नाकारले त्या माणसाचा वापर आम्ही का करायचा ? असा प्रश्न आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी उपस्थित केलाय. 

 

मागे

पंतप्रधानपदी मोदींपेक्षा गडकरीच बरे- अनुराग कश्यप
पंतप्रधानपदी मोदींपेक्षा गडकरीच बरे- अनुराग कश्यप

सोशल मीडियावरील कॉन्ट्रोव्हर्सी किंग अशी ओळख असलेला दिग्दर्शक अनुराग कश्....

अधिक वाचा

पुढे  

आझम खाननी अश्लील शब्दात केलेल्या टीकेला जया प्रदा यांचे प्रत्युत्तर
आझम खाननी अश्लील शब्दात केलेल्या टीकेला जया प्रदा यांचे प्रत्युत्तर

आझम खान यांनी माझ्याबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य माझ्यासाठी अजिबात नव....

Read more