By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 08, 2019 06:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
लोकसभा निवडणूक 2019 साठी भारतीय जनता पार्टीने आपले संकल्प पत्र जारी केले आहे. भाजपाने आपल्या संकल्प पत्रामध्ये शेतकरी, राम मंदिर, तिहेरी तलाक या मुद्द्यांवर भर दिला आहे. राष्ट्रीय सुरक्षा नितीवर भर दिला आहे. जम्मू आणि काश्मीर ला विशेष दर्जा देणाऱ्या संविधानातील कलम 35 A बद्दल भाजपाच्या संकल्प पत्रात मोठी घोषणा करण्यात आली आहे. पुन्हा सत्तेत आल्यास जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे 35 A कलम रद्द करणार असल्याचे भाजपातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
आम्ही कलम 35A संपवण्यासाठी कटीबद्ध आहोत. जम्मू आणि काश्मीरला लागू होणारे 35 A कलम हे स्थानिक नसलेल्या तसेच महिलांवर भेदभाव करणारे आहे. हे कलम म्हणजे जम्मू आणि काश्मीरच्या विकासात बाधा आहे. राज्यातील सर्व नागरिकांना सुरक्षित आणि शांतीपूर्ण वातावरण देण्यासाठी आम्ही सर्व पाऊले उचलू असेही भाजपाच्या संकल्प पत्रात म्हटले आहे. आम्ही काश्मीरी पंडीतांच्या सुरक्षिततेसाठीही प्रयत्न करणार असल्याचेही यात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ वर्षांनी २०२२ मध्ये केलेली कामं देशासमोर ठेवू ....
अधिक वाचा