By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: एप्रिल 04, 2019 05:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
या निवडणुकीत मुंबई उत्तर मतदारसंघातून भाजपने गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली आहे. गोपाळ शेट्टी यांच्यासमोर काँग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना मैदानात उतरवलं आहे. उत्तर मुंबईतून अभिनेत्री आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे यांनीही काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती.
उत्तर मतदारसंघातून भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा ४,४६,५८२ मतांनी पराभव केला होता.
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
गोपाळ शेट्टी |
भाजप |
६,६४,००४ |
संजय निरुपम |
काँग्रेस |
२,१७,४२२ |
सतीश जैन |
आप |
३२,३६४ |
नोटा |
|
८,७५८ |
कमलेश यादव |
सपा |
५,५०६ |
या निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेने गजानन किर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे. गजानन किर्तीकर यांच्यासमोर काँग्रेसच्या संजय निरुपम यांचं आव्हान आहे.
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांनी काँग्रेसच्या गुरुदास कामत यांचा १,८३,०२८ मतांनी पराभव केला होता.
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
गजानन किर्तीकर |
शिवसेना |
४,६४,८२० |
गुरुदास कामत |
काँग्रेस |
२,८१,७९२ |
महेश मांजरेकर |
मनसे |
६६,०८८ |
मयांक गांधी |
आप |
५१,८६० |
नोटा |
|
११,००९ |
मुंबई उत्तर पूर्व
या निवडणुकीत मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून भाजपने अखेर मनोज कोटक यांना उमेदवारी दिलेली आहे. मनोज कोटक यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय दीना पाटील यांच्याशी होणार आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये किरीट सोमय्या यांचा या मतदारसंघातून विजय झाला होता. पण मुंबई महापालिका निवडणुकीवेळी किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे शिवसेनेनं या मतदारसंघात किरीट सोमय्या यांना तिकीट द्यायला विरोध केला होता.
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून भाजपच्या किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय दीना पाटील यांचा ३,१७,१२२ मतांनी पराभव केला होता.
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
किरीट सोमय्या |
भाजप |
५,२५,२८५ |
संजय दीना पाटील |
राष्ट्रवादी काँग्रेस |
२,०८,१६३ |
मेधा पाटकर |
आप |
७६,४५१ |
मच्छिंद्र चाटे |
बसपा |
१७,४२७ |
अविनाश डोळस |
भारिप बहुजन महासंघ |
८,८३३ |
लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये शेवटच्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईमधून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या सहा जागांवर विजय मिळवला होता.
या निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात भाजपने पूनम महाजन यांना उमेदवारी दिली आहे. पूनम महाजन यांचा सामना काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्याशी आहे.
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा १,८६,७७१ मतांनी पराभव केला होता.
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
पूनम महाजन |
भाजप |
४,७८,५३५ |
प्रिया दत्त |
काँग्रेस |
२,९१,७६४ |
फिरोझ पालखीवाला |
आप |
३४,८२४ |
आनंद शिंदे |
बसपा |
१०,१२८ |
अबू आझमी |
सपा |
९,८७३ |
या निवडणुकीत मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात शिवसेनेने राहुल शेवाळे यांना उमेदवारी दिली आहे. राहुल शेवाळे यांचा सामना काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्याशी आहे.
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांचा १,३८,३४२ मतांनी पराभव केला होता.
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
राहुल शेवाळे |
शिवसेना |
३,८१,००८ |
एकनाथ गायक |
काँग्रेस |
२,४२,८२८ |
आदित्य शिरोडकर |
मनसे |
७३,०९६ |
सुंदर बालकृष्णन |
आप |
२७,६८७ |
गणेश अय्यर |
बसपा |
१४,७६२ |
या निवडणुकीत मुंबई दक्षिण मतदारसंघात शिवसेनेने अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे. अरविंद सावंत यांचा सामना काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांच्याशी आहे.
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये मुंबई दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी काँग्रेसच्या मुरली देवरा यांचा १,२८,१४८ मतांनी पराभव केला होता.
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
अरविंद सावंत |
शिवसेना |
३,७४,६०९ |
मुरली देवरा |
काँग्रेस |
२,४६,०४५ |
बाळा नांदगावकर |
मनसे |
८४,७७३ |
मीरा सन्याल |
आप |
४०,२९८ |
नोटा |
|
९,५७३ |
आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला....
अधिक वाचा