ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांची माघार

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 11:24 AM 2019-02-12T14:15:30+5:30

भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांची माघार

शहर : मुंबई

मध्य प्रदेशातील भोपाळ मतदार संघातून पाच उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामध्ये प्रज्ञा ठाकूर यांचे नाव देखील सामील आहे. प्रज्ञा ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र या प्रज्ञा ठाकूर वेगळ्या आहेत. या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर नसून अपक्ष उमेदवार प्रज्ञा ठाकूर आहेत. प्रज्ञा ठाकूर यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना पाठिंबा देत उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली. या मतदार संघातून प्रज्ञा सिंह ठाकूर यांची नावकरी प्रज्ञा ठाकूर यांनी देखील आपली उमेदवारी दाखल केली होती. एकच नाव असलेल्याने मतविभाजन होण्याची भीती भाजपला होती. यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी स्वत: अपक्ष उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांना घरी बोलवून त्यांची समजूत काढली. प्रज्ञा ठाकूर यांना निवडणूक न लढविण्याचे आवाहन साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना केले. त्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. तसेच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. प्रज्ञा ठाकूर यांनी माघार घेतल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या की, दोन प्रज्ञा आमने-सामने असूच शकत नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवार प्रज्ञाने उमेदवारी मागे घेतली आहे. यावेळी प्रज्ञा यांना भगवी शाल देऊन साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. 

मागे

नोटबंदीमुळे राज ठाकरेंच दुकान बंद- मुख्यमंञ्याचा टोला
नोटबंदीमुळे राज ठाकरेंच दुकान बंद- मुख्यमंञ्याचा टोला

नोटाबंदीच्या निर्णयामुळे राज ठाकरेंचे दुकान बंद झाले असा टोला मुख्यमंत्र....

अधिक वाचा

पुढे  

शरद पवारांनी पीएमपदासाठी या तीननेत्यांना दिले समर्थन
शरद पवारांनी पीएमपदासाठी या तीननेत्यांना दिले समर्थन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधानपदासाठी विरो....

Read more