ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मनसेने भाजपसाठी काढली खोचक प्रश्नपत्रिका...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 27, 2019 04:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मनसेने भाजपसाठी काढली खोचक प्रश्नपत्रिका...

शहर : मुंबई

लोकसभा निवडणुकीत कुठही नसलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आणि सत्ताधारी भाजप यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी अनेक सभेत भाजप आणि नरेंद्र मोदींच्या दुटप्पी भूमिकेची पुराव्यासहित पोलखोल केलीय. त्याला भाजपकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले. पुरसे ठरले नाही, म्हणून भाजपने देखील मनसे स्टाईल वापरत राज ठाकरे यांना प्रश्न विचारले. हे ताजे असतानाच आता मनसेने पुन्हा एक युक्ती लढवत भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न लावला आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईत एका सभेत राज ठाकरे यांची आधीचे भाषणे दाखवून पोलखोल केली. त्यामुळे सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकांचीच चर्चा सुरू झाली होती. मात्र ही चर्चा सुरू होत नाही, तोवर मनसेने भाजपच्या प्रतिहल्ल्याला उत्तर देण्याच्या उद्देशाने एक अनोखी प्रश्नपत्रिका समोर आणलीय. मुंबई मनसेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५६ गुणांची प्रश्नपत्रिका देण्यात आली आहे. तसेच सरकारच्या मागील पाच वर्षांतील कामकाजावर प्रश्न विचारण्यात आले आहेत. विषेश टीप म्हणून फडणवीस आणि मोदींना प्रश्न सोडवताना थोडी सूट दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. शुद्धलेखनाच्या नियमांची अट नाही, प्रश्न पत्रिका सोडविण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी अर्थात मतदानापूर्वीपर्यंत, उत्तरांसाठी संपूर्ण भाजप पक्ष, सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांची मदत घेण्यास मुभा, परीक्षेसाठी केंद्रावर येण्याची गरज नसून घरी बसून किंवा कार्यलयातून प्रश्न सोडवू शकता.

प्रश्नपत्रिकेत खोचक प्रश्न विचारण्यात आले आहेत. यामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे हे पाकिस्तानमधील कोणत्या नेत्याला वाटते, महाराष्ट्रातील कोणता नेता शेतकऱ्यांना साले म्हणतो, जवानांच्या पत्नीबद्दल वादग्रस्त वक्तव्य कोणत्या भाजप आमदाराने केले, शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कधी होणार, आजवर पंतप्रधानांनी किती पत्रकार परिषदा घेतल्या, पंतप्रधान किती देश फिरले, त्यातून काय साध्य झाले, राफेल करारावर पंतप्रधान जाहीरपणे स्पष्टीकरण का देत नाही. असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. यावर आता भाजप काय उत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मागे

राज ठाकरेंच्या दाव्यांची भाजपाकडून पोलखोल
राज ठाकरेंच्या दाव्यांची भाजपाकडून पोलखोल

राज ठाकरे यांनी 32 वेगवेगळे आरोप केले आहेत. त्यांनी दाखविलेले व्हिडीओ हे भाज....

अधिक वाचा

पुढे  

भडगावातील एका केंद्रावर सोमवारी पुन्हा मतदान
भडगावातील एका केंद्रावर सोमवारी पुन्हा मतदान

लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात 23 तारखेला पार पडलेल्या निवडणुकीत भडगाव शहराती....

Read more