ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

काँग्रेसचे 20 आमदार नाराज, केव्हाही करू शकतात पक्षांतर; येडियुरप्पांचा दावा

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 03:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

काँग्रेसचे 20 आमदार नाराज, केव्हाही करू शकतात पक्षांतर; येडियुरप्पांचा दावा

शहर : bangalore

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक राज्यातील राजकीय हालचाली थंडावल्या आहे. आता पुन्हा एकदा येथील राजकीय घडामोडींनी वेग येण्याची शक्यता आहे. तसा इशारा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपनेते बी.एस. येडियुरप्पा यांनी दिला आहे. काँग्रेसचे 20 आमदार कधीही निर्णय घेऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. राज्यातील काँग्रेसचे 20 आमदार विद्यमान सरकारवर नाराज आहेत. त्यामुळे हे आमदार कोणत्याही क्षणी निर्णय घेऊ शकतात. काही दिवसांपूर्वी देखील अशीच चर्चा रंगली होती की, काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करणार आहे. मात्र ही शक्यता काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी फेटाळली आहे. कुणीही निवडणुकीच्या तयारी लागले नसून आम्ही पाच वर्षे सरकार चालविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर युतीचे सरकार आहे. मात्र भाजपकडून आमदार खरेदी करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आल्याचे आरोप काँग्रेस आणि जेडीएसकडून करण्यात आले आहे. त्यात आता येडियुरप्पा यांच्या वक्तव्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. वर्तमान सरकारमधील 20 आमदार नाराज असून ते कधीही पक्षांतर करू शकतात. त्यामुळे वेट अन्ड वॉच असही युडियुरप्पा यांनी म्हटले आहे.

मागे

मोदी पुन्हा सत्तेत आले तर अमित शाह गृहमंत्री-अरविंद केजरीवाल
मोदी पुन्हा सत्तेत आले तर अमित शाह गृहमंत्री-अरविंद केजरीवाल

लोकसभा निवडणूकी देशात नरेंद्र मोदी हे पुन्हा सत्तेवर आले तर अमित शाह हे देश....

अधिक वाचा

पुढे  

मोदी-योगी ही भटकी जनावरं- प्रियंका गांधी
मोदी-योगी ही भटकी जनावरं- प्रियंका गांधी

प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना वा....

Read more