By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2019 01:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी हाती आला असून, एनडीएला ३५३ तर यूपीएला ९१ ठिकाणी विजय मिळवता आला आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत मतदारांनी नोटाला ही मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीतून हि माहिती समोर आली आहे. एकट्या राजस्थानमध्ये ३ लाख २७ हजार ५५९ लोकांनी नोटाला पसंती दिली आहे. हा आकडा राजस्थानमध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी १.१% टक्के ठरला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या पुढाकाराने देशात होणाऱ्या निवडणुकीत मतदारांना नोटा हा पर्याय, २०१३ पासून निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिला आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत मतदारांनी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला असून, मतदार संघातील उमेदवारांना नाकारले आहे. बिहारमधील ४० जागांवर झालेल्या निवडणुकीत ८ लाख १७ हजार मतदारांनी नोटा हा पर्याय वापरला आहे. बिहारमध्ये झालेल्या एकूण मतांच्या २% लोकांनी नोटाचा बटणाला पसंती दिली आहे.
पंजाबमध्ये १३ जागांपैकी ८ ठिकणी कॉंग्रेसला विजय मिळवता आला आहे. तर, याच पंजाबमध्ये १ लाख ५४ हजार ४२३ मतदारांनी कोणत्याच राजकीय पक्षाला मतदान न करता, नोटाचा बटन दाबणे पसंत केले आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत सुद्धा ४५००० पेक्षा जास्त लोकांनी नोटाचा वापर केला आहे.२०१३ मध्ये सुरु झालेल्या नोटा हा पर्याय पहिल्यांदाच २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आला. त्यावेळी देशभरात अंदाजे ६० लाख लोकांनी हा पर्याय स्वीकारला होता. देशात झालेल्या एकूण मतदानाच्या १.१% टक्के लोकांनी त्यावेळी नोटाला पसंती दिली होती.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्यसभा खासदार नारायण राणे ....
अधिक वाचा