By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 02, 2019 03:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले होते. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे मी मोठ्या अपेक्षाने पाहत होते. पंतप्रधान पक्षाचे नसतात, देशाचे असतात. त्यामुळे देशातील विकासाबद्दल, बेरोजगारी आणि महागाईवर मोदी स्पष्टीकरण देतील अशी अपेक्षा माझी होती. परंतु, शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत, नसल्याचे सांगत सुप्रिया सुळे यांनी मोदींकडून कुटुंबावर करण्यात आलेला हल्ला दुर्दैवी असल्याचे म्हटले.
सध्या सर्वसामान्य जनतेचे मुळ मुद्दे बाजुला ठेवण्यात येत आहे. पेट्रोल, डिजेल, गॅस सिलेंडर कधी स्वस्त होणार आहे. देशाचे पंतप्रधान एखाद्या कुटुंबावर हल्ला करतात, म्हणजे त्यांच्याकडे ठोस मुद्दे नाहीत. आम्ही कधीही कोणत्या कुटुंबावर टीका केलेली नाही. किंबहुना ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विकासाचा मुद्दा सोडून केवळ टीका करतात, म्हणजे मोदींकडे मागील पाच वर्षांत केलेले काहीही काम नसल्याचे सुळे यांनी म्हटले.
२०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, याविषयी मोदींनी चकार शब्द काढला नाही. पंतप्रधान देशाला दिशा देण्याचे काम करत असतात, असंही सुळे म्हणाल्या. बारामतीच टार्गेट का, यावर सुळे म्हणाल्या की, बारामती सर्वांनाच हवी-हवी वाटते. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामुळे बारामतीचा चेहरामोहरा बदलला. केंद्रीयमंत्री अरुण जेटली बारमतीत आले होते. त्यावेळी त्यांनीच बारामतीचे कौतुक केले होते, असंही सुळे यांनी सांगितले.
पाच वर्षांपूर्वी देशात लोकशाही होती. त्यावेळी आपलं मत व्यक्त करण्याची मुभा....
अधिक वाचा