By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 05:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तर, अजून काही टप्पे शिल्लक आहेत. महाराष्ट्रात आज चौथा आणि अखेरचा टप्पा आहे. पुण्यातील हडपसर भागात रहाणारे ९० वर्षांचे स्वातंत्र्यसेनानी दीनदयाळ मोहन वर्मा आणि त्यांच्या पत्नी कांता वर्मा या दोघांमध्ये उत्साह पाहण्यास मिळाला. या दोघांनीही मतदानाचा हक्क बजावत २१ व्या शतकातील युवावर्गाला मतदानाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी स्वातंत्र्य सेनानी दीनदयाळ मोहनलाल वर्मा यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, माझा जन्म युपी मधील एका गावामध्ये झाला. पण नंतर काही कामानिमित्त महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राचा झालो. मला सुरुवातीपासून अन्याय विरोधात लढण्याची सवय असल्याने संयुक्त महाराष्ट्र आणि गोवा मुक्ती संग्राम या लढ्यात देखील सहभागी झालो. या लढ्यात काही महिन्याचा कारावास देखील भोगावा लागला. तसेच मी पाहिल्या लोकसभेपासून प्रत्येक निवडणुकीत मतदान आजअखेर करीत आलो आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या हक्कासाठी लढलो. आता तुम्ही तुमचा मतदानाच्या माध्यमातुन हक्क बजावा. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
काँग्रेस नेते संजय झा यांनी नेल पॉलिश रिमूव्हर वापरलं असता आपल्या बोटावरील....
अधिक वाचा