By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 12:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
२३ मेरोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. त्याआधी झी २४ तासने महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघाचा कानोसा घेतला. यावेळी भाजप-शिवसेनेच्या युतीला मोठा फटका बसल्याचं दिसून आलं. या सर्वेक्षणानुसार भाजप-शिवसेनेला ३० जागा तर काँग्रेस-राष्ट्रवादीला १८ जागा मिळतील, असा अंदाज आहे. २०१४ सालच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेला एकूण ४२ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला ६ जागांवर समाधान मानावं लागंल होतं.
यंदा मात्र भाजपला १७, शिवसेनेला १३, काँग्रेसला ६, राष्ट्रवादीला ९ आणि इतरांना ३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. या आकडेवारीनुसार २०१४ सालच्या तुलनेत युतीच्या १२ जागा कमी होत असल्याचं दिसून आलं आहे.
भाजप-शिवसेनेच्या युतीला सगळ्यात जास्त फटका विदर्भात बसला आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत १० पैकी १० जागा जिंकलेल्या युतीला यावेळी मात्र फक्त ५ जागा मिळू शकतात. तर उत्तर महाराष्ट्रात युतीचा दबदबा कायम राहण्याची चिन्ह आहेत. उत्तर महाराष्ट्रात भाजपला ५, शिवेसनेला २, काँग्रेसला १ जागा मिळू शकते.
मराठवाड्यामध्ये भाजपला ४, शिवसेनेला २ आणि राष्ट्रवादीला २ जागा मिळण्याचा अंदाज आहे. मुंबई-कोकणात भाजपला ४, शिवसेनेला ५, काँग्रेसला १, राष्ट्रवादीला १ आणि इतरांना १ जागा मिळू शकते.
दिग्गज धोक्यात
केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि अशोक चव्हाण यांची जागा धोक्यात आहेत. तर नितीन गडकरींचं मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार हेदेखील मावळमधून पराभवाच्या छायेत आहेत.
lok sabha results 2019 लोकसभा निवडणुकांच्या निकालांचं चित्र अवघ्या काही तासांमध्ये स्प....
अधिक वाचा