ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

’संघा’च्या लोकांनी ब्रिटिशांची फक्त चमचेगिरी केली - प्रियंका गांधी

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 14, 2019 07:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

’संघा’च्या लोकांनी ब्रिटिशांची फक्त चमचेगिरी केली - प्रियंका गांधी

शहर : देश

लोकसभेच्या निवडणुकीचा आता फक्त शेवटचा टप्पा राहिलाय. मतदानाला अवघे काही दिवस राहिले असताना सर्वच नेत्यांनी प्रचारात आपली पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या, पंजाबचे लोक स्वातंत्र्य लढ्यात अग्रभागी होते. स्वातंत्र चळवळीत काँग्रेसच्या लोकांनी आपल्या जीवाची बाजी लावली. महात्मा गांधीजींच्या मागे सर्व देश उभा राहिला. त्यावेळी संघाचे लोक मात्र ब्रिटिशांची चमचेगीरी करत होते असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. या आधी राहुल गांधी यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरही टीका केली होती. स्वातंत्र्यवीरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती असा आरोपही त्यांनी केला होता.
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी पंजाबमधल्या प्रचारसभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी पंजाब प्रखर आंदोलन करत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हे ब्रिटिशांची चमचेगीरी करत होते असा आरोप त्यांनी केला. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं योगदान काय असा प्रश्न काँग्रेसकडून कायम विचारला जातो. संघाच्या लोकांनी स्वातंत्र चळवळीत सहभाग घेतला होता असं उत्तर संघ परिवाराकडून कायम दिलं जातं. याही निवडणुकीत तो मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला.
काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी 1984च्या दंगलीवर प्रतिक्रिया देताना जे झालं ते झालं, त्याचं आता काय? असं वक्तव्य केलं होतं. त्यावर देशभर वादळ निर्माण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केल्याने पित्रोदांना माफीही मागावी लागली होती. त्याला छेद देण्यासाठी आता काँग्रेसकडून स्वातंत्र्य चळवळीतल्या संघाच्या योगदानाचा मुद्दा उपस्थित करण्यात येत असल्याचं मतही व्यक्त होतंय.

मागे

पुन्हा एकदा संधी मिळाली की पंतप्रधान थापा मरणार नाहीत- आठवले
पुन्हा एकदा संधी मिळाली की पंतप्रधान थापा मरणार नाहीत- आठवले

 'पुन्हा एकदा संधी मिळाली की पंतप्रधान थापा मरणार नाहीत' अशा शब्दात कें....

अधिक वाचा

पुढे  

अमित शहांनी बंगालमध्ये भाडोत्री गुंड आणले - तृणमूल काँग्रेस
अमित शहांनी बंगालमध्ये भाडोत्री गुंड आणले - तृणमूल काँग्रेस

अमित शहा यांच्या कोलकातामधील रोड शो दरम्यान मंगळवारी झालेल्या राड्यावरून ....

Read more