ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजपाला महाराष्ट्र-यूपीत कमी जागा, मी दुसऱ्यांदा मंत्री होणार - आठवले

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 12, 2019 12:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजपाला महाराष्ट्र-यूपीत कमी जागा, मी दुसऱ्यांदा मंत्री होणार - आठवले

शहर : लातूर

लोकसभेच्या ०७ टप्प्यातील मतदानानंतर भाजप आणि एनडीएला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात फटका बसेल अशी शक्यता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.  केंद्र सरकारने महाराष्ट्राला दुष्काळ मदत जाहीर केल्यानंतर केंद्रातील मंत्री हे दुष्काळग्रस्त भागातील दौऱ्यावर आहेत. केंद्रीय सामाजिक-न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे ही दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. लातूर जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा आठवले यांनी केला. अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथील जैन समाजाच्या दिव्यज्योत चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या जिल्ह्यातील एकमेव चारा छावणीला त्यांनी भेट दिली.

२३ मे च्या निकालात भाजपला २६० ते २७० जागा मिळतील तर एनडीए ला ३०० ते ३२५ जागा मिळण्याची शक्यताही रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार असून आपलीही आगामी मोदी मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा मंत्रीपदी वर्णी लागेल असा आत्मविश्वासही आठवले यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम बंगाल, ओरिसा, दक्षिण भारतात भाजपला चांगलं यश मिळेल असा दावाही आठवले करीत आहेत. लातूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील दौऱ्याची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

मागे

सहाव्या टप्प्यासाठी मतदान सुरू, अनेक क्षेत्रातील दिग्गजांच्या मतदाना केंद्राबाहेर रांगा
सहाव्या टप्प्यासाठी मतदान सुरू, अनेक क्षेत्रातील दिग्गजांच्या मतदाना केंद्राबाहेर रांगा

सहाव्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. अनेक सेलिब्रेटींनी आपल्या मतदानाचा हक....

अधिक वाचा

पुढे  

भाषणांमध्ये अली आणि बजरंग बली ही वेळेची गरज- योगी आदित्यनाथ
भाषणांमध्ये अली आणि बजरंग बली ही वेळेची गरज- योगी आदित्यनाथ

लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल येण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ आहे. सहाव्या टप्प्....

Read more