By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 12:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
* बारामतीत १२ व्या फेरीअखेर सुप्रिया सुळे यांनी मिळवलं ७० हजारांच्या वर मताधिक्य
* अमेठीत भाजपाच्या स्मृती इराणींनी पुन्हा राहुल गांधी यांना टाकलं मागे | स्मृती इराणींची ७६०० मतांनी आघाडी
* गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांनी आपल्या गांधीनगरस्थित घराबाहेर येऊन मानले जनतेचे आभार
* साताऱ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले १५७१९ मतांनी आघाडीवर
* रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत ३८०३३ मतांनी आघाडीवर
* भाजपनं पार केला बहुमताचा आकडा | ११.०० वाजेपर्यंत भाजप+ ३३७, काँग्रेस+८३ तर इतर १२२ जागांवर आघाडीवर
* मावळमधून पार्थ पवार ८०३८९ मतांनी पिछाडीवर | पवार कुटुंबियांना धक्का | अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार पराभवाच्या छायेत
* बारामतीमधून नवव्या फेरीअखेर सुप्रिया सुळे यांना ९२७३ मतांची आघाडी
* सोलापूरमधून काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे आघाडीवर
* सांगलीमधून भाजपाचे संजय काका पाटील १५७३६ मतांनी आघाडीवर
* नांदेडमधून भाजपाचे सुधाकर श्रृंगारे ११६३८ मतांनी आघाडीवर
* भंडारा - गोंदियामधून भाजपचे सुनील मेंढे १७०९४ मतांनी आघाडीवर
* औरंगाबाद : हर्षवर्धन जाधव यांची ७०० मतांनी आघाडी | इम्तियाज जलील दुसऱ्या क्रमांकावर | चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर
* ठाणे लोकसभा मतदारसंघात सेनेच्या राजन विचारे यांना ५० हजार मतांची आघाडी
* मुंबई : निकालाचे कल पाहता सकाळपासून मुंबईतील काँग्रेस कार्यालयामध्ये शांतता
* दिल्ली : भाजपा मुख्यालयात सुरुवातीचे कल पाहिल्यानंतर कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष | फटाके फोडले, ढोलाच्या तालावर धरला ताल
* अहमदनगर भाजपा उमेदवार सुजय विखे पाटील ३७११० मतांनी आघाडीवर | संग्राम जगताप दुसऱ्या क्रमांकावर
* औरंगाबादमधून एमआयएम उमेदवारी इम्तियाज जलील १५,७५८ मतांनी आघाडीवर
* निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, भाजपा २७९ जागांवर आघाडीवर तर काँग्रेस ५१ जागांवर आघाडीवर
* कर्नाटकमधील २८ लोकसभा मतदारसंघापैंकी तब्बल २४ लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आघाडीवर | काँग्रेसला केवळ दोन जागांवर आघाडी
* मैनपुरीमधून मुलायम सिंह आघाडीवर
* रामपूरमधून जया प्रदा आघाडीवर | आझम खान पिछाडीवर
* लखनऊमधून भाजप उमेदवार राजनाथ सिंह आघाडीवर
* उत्तर प्रदेशातील भाजपच्या उमेदवार मनेका गांधी पिछाडीवर
* वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी २० हजार मतांनी आघाडीवर तर भाजप अध्यक्ष गांधीनगरमधून अमित शाह ५० हजार मतांनी आघाडीवर
* सांगली : भाजपाचे संजय काका पाटील १२०० मतांनी आघाडीवर | वंचीत बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर दुसऱ्या स्थानावर
* चंद्रपूर : भाजपचे हंसराज अहीर यांना १०६७९ मतं तर बाळू धानोरकर यांना ८७३४ मतं | भाजप १०४५ मतांनी पुढे
* शिरूर : अमोल कोल्हेंना ५६४३८ मतं तर शिवाजी आढळराव पाटील यांना ३९९८८ मतं | अमोल कोल्हे १६४५० मतांनी आघाडीवर
* अकोला : दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू | भाजपचे संजय धोत्रे १८२२३ मतांनी पुढे | दुसऱ्या क्रमांकावर प्रकाश आंबेडकर
* नागपूर : पहिल्या फेरीअखेर भाजपाचे नितीन गडकरींना ४०,८५१ मतं तर पटोलेंना २५२२९ मतं | भाजपला १५६२२ मतांची आघाडी
* गुनामधून ज्योतिरादित्य शिंदे पिछाडीवर
* वाराणसीमधून नरेंद्र मोदी तर रायबरेलीमधून सोनिया गांधींनी पुन्हा एकदा घेतली आघाडी
* अजित पवार यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार तब्बल ३१ हजार मतांनी पिछाडीवर
* रायबरेलीमधून काँग्रेस उमेदवार सोनिया गांधी पिछाडीवर
* राज्यातील दिग्गज पिछाडीवर | सुप्रिया सुळे, पार्थ पवार, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण पिछाडीवर
* मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर तासाभरात भाजपानं गाठला बहुमताचा आकडा | भाजपा+ २७२ जागांवर आघाडीवर तर काँग्रेस+ १०२ जागांवर आघाडीवर तर इतर पक्षांना ६३ जागांवर आघाडी
* वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी तब्बल १७,००० मतांनी आघाडीवर
* अमेठी मतदारसंघातून स्मृती इराणी आघाडीवर | राहुल गांधी तब्बल ५७०० मतांनी पिछाडीवर
* जळगाव : भाजपाचे उन्मेष पाटील आघाडीवर | राष्ट्रवादीचे माजी मंत्री देवकर पिछाडीवर
* बारामती : सुप्रीया सुळे यांची आघाडी घटली | विरोधी उमेदवार कांचन कुल यांच्यापेक्षा केवळ ४०० मतांनी सुप्रिया सुळे आघाडीवर
* महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदार संघांतील कल हाती : भाजप - १७ | शिवसेना - १३ | काँग्रेस - ८ राष्ट्रवादी - ८ | इतर - २ जागांवर आघाडी
* हैदराबाद मतदार संघातून AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आघाडीवर
* बेगुसराय मतदार संघातून कन्हैया कुमार पिछाडीवर
* वाराणसीमधून पंतप्रधान आणि भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी पिछाडीवर
* बीडमधून भाजप उमेदवार प्रितम मुंडे आघाडीवर
* फतेहपूरसिक्री मतदारसंघातून राज बब्बर पिछाडीवर
* काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वायनाडमधून आघाडीवर तर अमेठीतून पिछाडीवर | अमेठीतून भाजप उमेदवार स्मृती इराणी आघाडीवर
* मावळ मतदार संघातून पार्थ पवार पिछाडीवर
* उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर पिछाडीवर | भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी घेतली आघाडी
* रायबरेलीमधून सोनिया गांधी आघाडीवर
* शसासाराममधून काँग्रेस उमेदवार मीरा कुमार आघाडीवर
* गुजरातच्या गांधीनगरमधून भाजप उमेदवार अमित शाह आघाडीवर
* भाजप १३० जागांवर आघाडी | तर काँग्रेस ५७ जागांवर आघाडीवर | इतरांना २७ जागांवर आघाडी
* बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रीया सुळे आघाडीवर
* भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ३००० मतांनी आघाडीवर
* अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष आणि उमेदवार राहुल गांधी आघाडीवर
* नंदुरबारमध्ये हिना गावित आघाडीवर
* हातकणंगलेमधून राजू शेट्टी आघाडीवर
* कोल्हापुरात राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक आघाडीवर
* वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर
* सुरुवातीला काही वेळातच भाजपनं घेतील ४८ जागांवर आघाडी | तर यूपीए २० जागांवर आघाडीवर
* नांदेड, महाराष्ट्र : नांदेडमधून काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण आघाडीवर
* पहिला कल एनडीएच्या बाजुनं
* देशभरात मतमोजणीला सुरुवात | थोड्याच वेळात कल येणार हाती
* नवी दिल्ली : दिल्लीतील भाजप मुख्यालयाबाहेर मृत्युंजय मंत्राचा जाप सुरू | विद्यार्थ्यांचा मोदींच्या समर्थनार्थ चौकीदाराचे टी-शर्ट घालून भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष
* नागपूर : नितीन गडकरी यांच्या घरासमोर विजयाची जय्यत तयारी | खास मंडप उभारला
* नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचं होम-हवन, काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी राहुल गांधी पंतप्रधानपदी विराजमान व्हावेत, अशी केली प्रार्थना | काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर राम मंदिर बनवलं जाईल, शर्मांचा दावा | 'राहुल - प्रियांका सेना जिंदाबाद' पोस्टर फडकावले
* मुंबई : काँग्रेस नेते आणि उत्तर-पश्चिम मतदार संघातील उमेदवार संजय निरुपम सकाळीच सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी दाखल
* भाजपचे गोरखपूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवारी आणि अभिनेता रवि किशन यांनी निकालाआधी देवाकडे केली प्रार्थना
हा राजू शेट्टी यांचा मतदारसंघ आहे. देशपातळीवरील शेतकरी नेता म्हणून त्यांची....
अधिक वाचा