By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 05:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यातील प्रचार शनिवारी संपला. चारही टप्प्यात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांनी एकूण ७८ सभा घेतल्या आहेत. अनेक ठिकाणी उन्हाचा पारा ४० डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचला असल्याचे पहायला मिळाले. अशा उन्हातही ७९ वर्षीय शरद पवारांच्या सभांचा धडका सुरूच होता. दिवसातून तीन सभांना शरद पवार हजेरी लावत असल्याचे पहायला मिळाले. तरूण राजकीय नेत्याला ही शक्य होणार नाही एवढी प्रचंड मेहनत शरद पवार घेतांना दिसले. रोजच्या ठरलेल्या नियोजित दौरा करून पवार तीन सभांना उपस्थित राहत असे. डोक्यावर प्रचंड ऊन असताना ही पवारांनी आपल्या सभा पार पाडल्या. शरद पवारांचे वय ७९ वर्षे झाले आहे. तर, प्रचंड उन्हाचा पारा बघता अनेक उमेदवार आणि राजकीय नेते सकाळी आणि संध्याकाळी प्रचाराला बाहेर पडताना पहायला मिळत होते. मात्र शरद पवार याला अपवाद असून त्यांच्या पूर्ण दिवस प्रचारात आणि प्रवासात व्यस्त जात होता.
महाराष्ट्रातील अनके भागात शरद पवारांनी महाआघडीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या. काँग्रेसमध्ये महाराष्ट्रात विशेष असा चेहरा उरला नाहीत, त्यामुळे राष्ट्रवादी बरोबरच कॉंग्रेसमधून सुद्धा पवारांच्या सभांना मागणी होती. शरद पवार नियोजित प्रत्यके सभेला हजेरी लावतांना पहायला मिळाले आहे.
क्रिकेटचे मैदान गाजविणारा गौतम गंभीर निवडणुकीच्या मैदानावर अडचणीत सापडला....
अधिक वाचा