ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मोदी इतरवेळी ठीक असतात, पण निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येतं - शरद पवार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 07, 2019 05:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मोदी इतरवेळी ठीक असतात, पण निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येतं - शरद पवार

शहर : baramati

मोदी यंदा पंतप्रधान होणार नाहीत, खासदार होतील, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. ते बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. त्याचबरोबर ज्यांच्या घरातच कुणी नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरातल्या भांडणाबद्दल बोलू नये, असा टोलाही पवारांनी मोदींना लगावलाय. मी कधी कुणावर व्यक्तिगत टीका करत नाही, तो ठेका मोदींनी घेतलाय, असंही पवार म्हणाले.

कोणावरही वैयक्तिक टीका करून नका, त्याची जबाबदारी पंतप्रधानांनी घेतली आहे, असा सल्ला पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. येत्या १० तारखेला पंतप्रधान हे बारामतीमध्ये आहेत, तेव्हा ते टीका करतीलच. काही दिवसांपूर्वी वर्ध्यात म्हणजेच बारामतीपासून ६००-७०० किलोमीटर लांब त्यांनी माझ्यावर टीका केली. हे काम त्यांच्याकडेच असल्याचा टोला पवारांनी लगावला.

'माझ्या घरात भांडण आहे, हे मोदींना कसं काय समजलं? मोदी साहेब आमचं घर भरलेलं आहे. ज्यांच्या घरात कोण आहे का नाही, हेच दुसऱ्याला माहिती नाही त्यांनी इतरांच्या घराबद्दल बोलू नये असे म्हणतात, असा चिमटाही पवारांनी काढला.'

मोदींचे आणि माझे संबंध चांगले आहेत. मी कधी कुणावर व्यक्तिगत टीका करत नाही. हे त्यांनाही माहिती आहे. यावेळी मोदी पंतप्रधान झाले नाही झाले तरी कदाचित खासदार होतील. मीपण सध्या खासदार आहे त्यामुळे भेटल्यावर मोदींना आमच्या कुटुंबाबद्दल नक्कीच माहिती देईन', असा निशाणा पवारांनी साधला.

मोदींनी दिल्ली, बारामती आणि वसंतदादा श्यूगर इन्स्टिट्यूटमध्ये केलेल्या कौतुकाचा दाखलाही शरद पवार यांनी दिला. मोदींची ती भाषण देशभरात गाजली. मोदी इतरवेळी ठीक असतात, पण निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येतं, अशी बोचरी टीका शरद पवार यांनी मोदींवर केली.

 

 

मागे

“धनंजय मुंडे आणि त्यांचे आमदार तोडपाणी करतात”; पंकजां मुंडेचा गंभीर आरोप
“धनंजय मुंडे आणि त्यांचे आमदार तोडपाणी करतात”; पंकजां मुंडेचा गंभीर आरोप

धनंजय मुंडे आणि त्यांचे आमदार तोडपाणी करतात. त्यामुळे ते गोपीनाथ मुंडे यां....

अधिक वाचा

पुढे  

मराठा क्रांती मोर्चा निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मराठा क्रांती मोर्चा निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मराठा क्रांती मोर्चा, महामुंबईने मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर मुख्य ....

Read more