By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 02, 2019 11:57 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मागील पाच वर्षांत सामनातून सरकारवर टीका करणाऱ्या शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्ध्यातील जाहीर सभेतील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या बॅनरवरील कमळाच्या चिन्हावरून अद्याप मौन बाळगले आहे. या सभेत मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका करताना पवार कुटुंबियांना टार्गेट केले. परंतु, यापेक्षाही मोदींची सभा शिवसेनेच्या बॅनरमुळेच चर्चेत आली आहे.
सभेत लावण्यात आलेल्या बॅनरमुळे सोशल मीडियावर शिवसेना-भाजप विषयीच्या चर्चांना ऊत आला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या बॅनरवर कमळाचे चिन्ह दाखविण्यात आले असून त्यातून धनुष्यबाण गायब होता. यावर अद्याप शिवसेनेकडून काहीही प्रतिक्रिया आलेले नाही. लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्यापासून शिवसेना आणि भाजप यांच्यातील समेट घडून आल्याचे चित्र होतं. एवढच नाही तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव यांनी गुजरात वारी देखील केली होती. परंतु, त्याच भाजपकडून मोदींच्या सभेत शिवसेना नेत्यांच्या बॅनरवरून धनुष्यबाणाचे चिन्ह गायब करण्यात आले. तसेच त्यावर कमळाचे चिन्ह टाकण्यात आले. यामुळे युतीमध्ये वर्चस्ववादाचा लढा नसून राष्ट्रीय पक्षाकडून प्रादेशिक पक्ष असलेल्या शिवसेनेचे अस्तित्वच मान्य नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान सभास्थळी लावण्यात आलेल्या बॅनरवरून सोशल मीडियावर पक्ष विकायचा नसतो, तर वाढवायचा असतो, अशी टीका शिवसेनेवर होत आहे.
दगा देऊ नका, आम्हीही देणार नाही : उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्ध्यातील सभेआधीच एका मुलाखतीत भाजपला इशारा देताना म्हटले होते की, तुम्ही दगा देऊ नका. आम्हीही देणार नाही. परंतु, त्याच दिवशी मोदींच्या सभेत भाजपकडून बॅनरच्या मदतीने शिवसेनेला आव्हान देण्यात आले आहे. यावरून युतीमध्ये सर्वकाही सुरळीत दिसत असले तरी अंतर्गत कलह असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भारतीय लष्कर हे ‘नरेंद्र मोदी यांची सेना आहे’ असं वादग्रस्त वक्तव्य उत्....
अधिक वाचा