ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मध्यप्रदेशमध्ये स्मृती इराणीच्या सभेला अर्ध्याहून अधिक खुर्च्या खाली

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 02:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मध्यप्रदेशमध्ये स्मृती इराणीच्या सभेला अर्ध्याहून अधिक खुर्च्या खाली

शहर : bhopal

लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या दोन टप्यात मतदान होण्याचे बाकी असताना, सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी सभांचा धडाकाच लावला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना आपल्या एका सभेत भाषण उरकते घेत काढत पाय घेण्याची वेळ आली. मध्यप्रदेशमध्ये सभेसाठी गेलेल्या स्मृती इराणी यांच्या सभेला गर्दीच जमली नसल्याचे समोर आले आहे.
मध्यप्रदेश मधील ग्वाल्हेर लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार विवेक शेजवलकर यांच्या प्रचारासाठी स्मृती इराणी डबरा येथे आल्या होत्या. डबरा येथे सभेला संबोधित करण्यासाठी इराणी पोहचल्यावरही सभेला गर्दीच झाली नाही. अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या दिसताच स्मृती इराणी यांनी अर्धवट भाषण देत दिल्लीकडे रवाना झाल्यात.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत रिकाम्या खुर्च्याचा फटका याआधी सुद्धा अनेक नेत्यांना बसला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतून लोक खुर्च्या सोडून बाहेर पडतानाचे व्हिडिओ समोर आले होते.
ग्वाल्हेर लोकसभा मतदार संघ सिंधिया कुटुंबाच बालेकिल्ला समजला जातो. 1984 मध्ये पहिल्यांदा निवडून येणारे माधवराव सिंधिया हे पुढील 4 निवडणुकांमध्ये विजयी ठरले होते. यावेळी मात्र भाजपकडून विवेक शेजवळकर तर काँग्रेसने अशोक सिंग यांना रिंगणात उतरवले आहे.

मागे

मोदी मोदीच्या घोषणा करत नवज्योतसिंग सिद्धूंच्या दिशेने महिलेने फेकली चप्पल 
मोदी मोदीच्या घोषणा करत नवज्योतसिंग सिद्धूंच्या दिशेने महिलेने फेकली चप्पल 

नवज्योतसिंग सिद्धू सध्या प्रचारात व्यस्त असून आपल्या सभेतून सतत पंतप्रधा....

अधिक वाचा

पुढे  

सिंहांकडून 640 जणांना चहा, तर साध्वींकडून 581 जणांना टोप्या!
सिंहांकडून 640 जणांना चहा, तर साध्वींकडून 581 जणांना टोप्या!

लोकसभा निवडणूक कालावधीत आयोगाला तीन वेळा प्रचारासाठी खर्च केलेल्या खर्चा....

Read more