ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आमदार कोळंबकर यांचा राहुल शेवाळेंना पाठिंबा...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 17, 2019 03:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आमदार कोळंबकर यांचा राहुल शेवाळेंना पाठिंबा...

शहर : मुंबई

कॉग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार राहुल शेवाळेंना पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे दक्षिण मुंबईत कॉग्रेसला धक्का बसला आहे. कट्टर राणे समर्थक मानले जाणारे कोळंबकर लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केल्यानं कोळंबकर आणि काँग्रेसमध्ये दुरावा निर्माण झाला होता. तर आता कोळंबकर यांनी थेट युतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. युतीचे उमेदवार राहुल शेवाळे  यांनी आज कोळंबकर यांची भेट घेतली आहे. दक्षिण मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यात लढत आहे. महिन्याभरापूर्वीच कालिदास कोळंबकर त्यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या फलकावरुन चर्चेत आले होते. कोळंबकर यांच्या कार्यालयाबाहेरील फलकावरुन काँग्रेस नेत्यांचे फोटो हटवून त्यांच्या जागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. याबद्दल बोलताना मी काँग्रेसमधून बाहेर पडलो नाही. काँग्रेसमधून मला बाहेर करण्यात आलं, असं कोळंबकर यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्र्यांचे आभार मानल्यावर विभागातल्या कट आऊटवरुन माझा फोटो काढण्यात आला. मग मी त्यांचे फोटो माझ्या बॅनरवर का लावू, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जनतेला लोकप्रतिनिधींकडून कामं हवी आहेत. जी व्यक्ती कामं करुन देते, जनता त्याच्याच पाठिशी उभी राहते. मुख्यमंत्री प्रलंबित कामं मार्गी लावतात. त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं, तर त्यात गैर काय?, असा प्रश्न कोळंबकर यांनी विचारला. कोळंबकर यांनी पाठिंबा दिल्यानं शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आनंद व्यक्त केला. कोळंबकर माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. त्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य मिळाल्यानं माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

मागे

टीटीव्ही दिनाकरन यांच्या कार्यालयावर छापा; 4 कार्यकर्त्यांना अटक
टीटीव्ही दिनाकरन यांच्या कार्यालयावर छापा; 4 कार्यकर्त्यांना अटक

लोकसभा निवडणुकीच्या काळात काळ्या पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी निवडणूक आयो....

अधिक वाचा

पुढे  

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी मीठागरांची जमीन ताब्यात घेणार...
गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी मीठागरांची जमीन ताब्यात घेणार...

 मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडण्यासाठी पालिकेने गोरेगाव-मुलुं....

Read more