By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 01:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
Election results 2019, Lok sabha Election results 2019, lok sabha results 2019 लोकसभा निवडणुकीचा loksabha election 2019 रणसंग्राम गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र चर्चेत असणाऱ्या आणि देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणुकांमध्ये काही तुल्यबळ लढतीही पाहायला मिळाल्या. मग ते सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणाऱ्या गोपाळ शेट्टी यांना 'रंगीला गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी दिलेलं आव्हान असो, किंवा गुरदासपूरच्या मतदार संघातून अभिनेता सनी देओलने निवडणुकीच्या रिंगणात उतरणं असो. इतकच नव्हे तर, 'स्वराज्यरक्षक संभाजी...' फेम अमोल कोल्हेची शिरुर मतदार संघातील राजकीय खेळीही कितपत यशस्वी ठरते यावर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल. तर, उत्तर प्रदेशातील रणसंग्रामात आझम खान आणि जया प्रदा यांच्यातील लढतही सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली.
जया प्रदा यांच्या भाजपा प्रवेशानंतर आझम खान यांनी त्यांच्यावर केलेल्या टीका आणि त्यानंतर आक्षेपार्ह वक्तव्यावरुन रंगलेलं विरोधाचं राजकारण, पाहता मताधिक्य मिळवण्यात यशस्वी कोण ठरणार हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा. जया प्रदा आणि आझम खान यांच्या लढतीशिवाय उत्तर मुंबई मतदार संघावरही अनेकांचं लक्ष असणार आहे. कारण या मतदार संघातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
उर्मिला मातोंडकर आणि गोपाळ शेट्टी यांच्या मतदार संघाकडे सुरुवातीपासूनच देशाच्या राजकीय विश्वाचं लक्ष लागलेलं होतं. गोपाळ शेट्टी यांच्यावर झालेले आरोप, त्यांच्या नावे समोर आलेले घोटाळे पाहता उर्मिलाने तिच्या या मतदार संघात खऱ्या अर्थाने तळागाळाशी जाऊन मतदारांशी संवाद साधला. याच तंत्राचा अनेकावर सकारात्मक परिणामही झाला असल्याचं म्हटलं जात आहे. परिणामी आपल्या विजयाविषयी उर्मिला कमालीची आशावादी आहे.
एकिकडे 'रंगीला गर्ल' या मोठ्या जोमाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करत असतानाच दुसरीकडे हेमा मालिनी यांनी मथुरेच्या मतदार संघात प्रचार करण्यासाठी कोणतीही कमतरता राहू दिली नव्हती. सर्वात श्रीमंत उमेदवारापासून सर्वात वादग्रस्त मतदार संघापर्यंत प्रत्येक प्रकाशझोतात येणाऱ्या गोष्टीत हे सेलिब्रिटी उमेदवार चमकले खरे. पण, आता त्यांच्यातल्या अभिनेत्यापेक्षा एक नेता म्हणून मतदार राजाची पसंती कोणाच्या पारड्यात पडते हे पाहणं महत्त्वाचं. अवघ्या काही क्षणांमध्ये आता लोकसभा निव़डणुकांचे कल हाती येण्यास सुरुवात होणार आहे. तेव्हा आता मताधिक्याची ही आकडेवारी पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
*पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदार संघातून बाबूल सुप्रियो आघाडीवर आहेत. तर, जादवपूर येथून तृणमूलच्या मिमी चक्रवर्ती यांनी आघाडी घेतली आहे.
*शिरूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे १९ हजार ७५७ मतांनी आघाडीवर
*पटना साहिब मतदार संघातून अभिनेते आणि काँग्रेस उमेदवार शत्रुघ्न सिन्हा पिछाडीवर. भाजपाच्या रवी शंकर प्रसाद यांच्याकडे आघाडी.
*अमेठी मतदार संघातून स्मृती इराणी ९ हजार मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे राहुल गांधी पिछाडीवर
*शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्याकडे ४० मतांची आघाडी
*जया प्रदा पिछाडीवर, रामपूर मतदार संघातून आझम खान यांच्याकडे आघाडी
*गुरदासपूरमधून अभिनेता सनी देओलला आघाडी
*अमोल कोल्हे १४ हजार मतांनी आघाडीवर
*शिवाजीराव आढळरावांना मागे टाकत शिरुर मतदार संघातून राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर
*उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर पिछा़डीवर
*गोरखपूर मतदार संघातून रवी किशन आघाडीवर
* गोरखपूर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या रवी किशन यांनी निकालाच्या दिवसाची सुरुवात देवदर्शनाने केली.
२३ मेरोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. त्याआधी झी २४ तासने महारा....
अधिक वाचा