ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मोदी राफेलमधल्या दलालीच्या पैशातून आमदार विकत घेत आहेत - अरविंद केजरीवाल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 06, 2019 01:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मोदी राफेलमधल्या दलालीच्या पैशातून आमदार विकत घेत आहेत - अरविंद केजरीवाल

शहर : delhi

लोकसभा निवडणूक 2019च्या पाचव्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. त्याचदरम्यान सहाव्या आणि सातव्या टप्प्यासाठी राजकीय नेत्यांचा प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या . बंगाल आणि झारखंडमध्ये निवडणूक प्रचारानं रंगत आणली आहे. अरविंद केजरीवाल यांनीही प्रचारादरम्यान मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. नोटाबंदी हा देशातील स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा आहे. जर व्यापाऱ्यांनी भाजपाला मतदान केलं तर सीलिंग सुरूच राहणार आहे. पण 'आप'ला मतदान केल्यास सीलिंग थांबू शकतं, असंही केजरीवाल म्हणाले आहेत. मोदींनी राफेलमधून बक्कळ पैसा कमावला, त्याच पैशानं आता मोदी आमदार विकत घेत आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. आज देशात टॅक्स टेररिज्म पसरला आहे. त्यामुळे देशात भीती आहे. मोदी सांगतायत की, दहशतवाद्यांना आम्ही घरात घुसून मारलं, पण पाकिस्तानवाल्यांना पुन्हा मोदीच पंतप्रधान व्हावेत, असं वाटतंय. मोदींचे पाकिस्तानबरोबर गहन संबंध आहेत. मग ते राष्ट्रवादी कसे ठरतील, असंही केजरीवाल म्हणाले आहेत.तर दिल्लीत आपला पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे. बिजवासनमधून आपचे आमदार असलेले देवेंद्र सिंह सहरावत भाजपाचा गोटात सामील होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी अरविंद वाजपेयी भाजपामध्ये सामील झाले आहेत.

मागे

25 वर्षे आमदार असताना काय केले? असे विचारणाऱ्या तरुणाच्याच माजी मुख्यमंत्र्यांनी कानशिलात लगावले
25 वर्षे आमदार असताना काय केले? असे विचारणाऱ्या तरुणाच्याच माजी मुख्यमंत्र्यांनी कानशिलात लगावले

लोकसभा, विधानसभेमध्ये निवडून गेलेल्या उमेदवाराला त्याने काय काम केले हे वि....

अधिक वाचा

पुढे  

तेजबहादूर यादव यांची वाराणसीतून उमेदवारी रद्द,सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
तेजबहादूर यादव यांची वाराणसीतून उमेदवारी रद्द,सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातवाराणसी लोकसभा मतदारसंघातून दंड थोपटणाऱ्....

Read more