ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लोकसभा निवडणूक २०१९ : आज मात्र दोन मतदान केंद्रांवर पुनर्मतदान

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 22, 2019 12:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लोकसभा निवडणूक २०१९ : आज मात्र दोन मतदान केंद्रांवर पुनर्मतदान

शहर : देश

लोकसभा निवडणूक २०१९ चा उद्या अर्थात २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. परंतु, आज मात्र दोन मतदान केंद्रांवर पुनर्मतदान होत आहे. लोकसभा निवडणूक २०१९ साठी सात टप्प्यांत १९ मे रोजी निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. परंतु, अमृतसर आणि कोलकाता उत्तर लोकसभा मतदारसंघातील एक-एक मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाला रद्द करण्यात आलंय. या दोन्ही मतदान केंद्रांवर आज निवडणूक आयोगाकडून पुनर्मतदान प्रक्रिया राबवण्यात येतेय.

अमृतसर लोकसभा मतदारसंघाच्या मतदान केंद्र क्रमांक १२३ आणि २४ कोलकाता उत्तर लोकसभा मतदान केंद्र क्रमांक २०० वर पुनर्मतदान प्रक्रिया सुरू आहे. सायंकाळी .०० वाजेपर्यंत इथं मतदान होणार आहे.

मंगळवारी निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात याबद्दल माहिती देण्यात आली. या मतदान केंद्रांवर १९ मे रोजी पार पडलेलं मतदान रद्द करण्यात आल्याचं यात म्हटलं गेलं होतं.

मतदान केंद्रासंबंधी रिटर्निंग ऑफिसर आणि जनरल निरीक्षकांकडून देण्यात आलेल्या माहितीनंतर आणि अन्य तथ्यांचा विचार करून पुनर्मतदानाचा निर्णय घेण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं. मतदान प्रक्रियेत चुका आढळून आल्यानं या मतदान केंद्रांवरील मतदान रद्द करण्यात आल्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला.

 

मागे

 एक्झिट पोल : गरज भासल्यास हातात शस्त्रं घेऊन संरक्षण करु
एक्झिट पोल : गरज भासल्यास हातात शस्त्रं घेऊन संरक्षण करु

लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमधील आकडेवारीने राजकीय वातावरण तापू लागलेल....

अधिक वाचा

पुढे  

व्हीव्हीपॅट पावती मोजण्याच्या प्रक्रियेत काही बदल होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने केले स्पष्ट
व्हीव्हीपॅट पावती मोजण्याच्या प्रक्रियेत काही बदल होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

लोकसभा निवडणूक 2019 च्या निकालाचे एक्झिट पोल जारी झाले आहेत. यामध्ये भाजपाप्र....

Read more