By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 25, 2019 06:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
अनेकदा आपल्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत आलेले स्वयंभू बाबा स्वामी ओम यांनी रविवारी आपण नवी दिल्लीच्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलंय. 'बिग बॉस' या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या या बाबांना मुलींवर कमेंट केल्यानंतर मारही खावा लागला होता. आपण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'हिंदूविरोधी' तत्वाविरुद्ध लढणार असल्याचं स्वामी ओम यांनी म्हटलंय. अनेक हिंदू संघटनांनी शनिवारी बैठक घेऊन आपल्याला नेता म्हणून निवडल्याचं ओम यांनी म्हटलंय.
स्वामी ओम याआधीही अनेकदा वादांत अडकलेले जनतेनं पाहिलंय. बिग बॉसच्या दहाव्या सीझनमध्ये त्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवला होता. यावेळी त्यांनी इतर स्पर्धकांसोबतच कार्यक्रमाचा होस्ट अभिनेता सलमान खानलाही चांगलंच भंडावून सोडलं होतं. एका स्पर्धकावर तर टॉयलेटमधलं पाणीही फेकण्यावर त्यांची मजल गेली होती.
त्यानंतर पुन्हा ते चर्चेत आले एका टीव्ही चॅनलवर एका महिलेला मारहाण करण्यासाठी... यामुळे मोठा वादही झाला होता. इतकंच नाही तर स्वामी ओम यांच्याविरुद्ध त्यांच्या भावानं कागदपत्रं चोरीचा आरोपही केलाय.
अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याविरोधी करण्यात आलेल्या आंदोलनात जबरदस्तीनं जंतर-मंतरवर दाखल होण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाबांना महिलांनी जोरदार विरोध केला होता. इथं एका महिलेनं तर बाबांना एका झापडीत अस्मानही दाखवलं होतं. महिलांविषयी अपशब्द वापरणाऱ्या स्वामी ओम यांची नोएडामध्ये चांगलीच धुलाईही झाली आहे.
लोकसभा 2019 च्या रणसंग्रामात काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. आपण सत्तेत आलो तर....
अधिक वाचा