ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अजब-गजब : ११०७ करोडोंच्या संपत्तीच्या मालकाला केवळ ११०७ मतं

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 07:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अजब-गजब : ११०७ करोडोंच्या संपत्तीच्या मालकाला केवळ ११०७ मतं

शहर : देश

लोकसभा निवडणूक २०१९ निकाल आता जवळपास स्पष्ट झालेत. या निकालांत भाजपा देशातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय. २०१९ च्या निकालांत भाजपनं आपलाच २०१४ चा रेकॉर्ड तोडत बहुमताचा मोठा आकडा गाठलाय. परंतु, या दरम्यान आणखी एका अपक्ष उमेदवाराची मोठी चर्चा आहे. हे उमेदवारी म्हणजे बिहारच्या पाटलीपुत्र मतदार संघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे रमेश कुमार शर्मा...रमेश कुमार शर्मा याआधी चर्चेत आले ते त्यांच्या संपत्तीमुळे... २०१९ च्या निवडणुकीतील रमेश शर्मा हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले होते. अर्ज दाखल करताना रमेश शर्मा यांनी आपल्या संपत्तीचा उल्लेख करत आपली तब्बल ११०७ करोड रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. उल्लेखनीय म्हणजे, लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये रमेश शर्मा यांना केवळ ११०७ मतं मिळालीत. या मतदारसंघात भाजपाकडून राम कृपाल यादव तर आरजेडीकडून मीसा भारती यांना रमेश शर्मा टक्कर देत होते. मतमोजणीत या मतदारसंघात राम कृपाल यादव प्रथम क्रमांकावर तर मीसा भारती दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

कोण आहेत रमेश शर्मा

रमेश शर्मा हे चार्टर्ड इंजिनिअर पदवीधारक आहेत. त्यांच्याकडे नऊ वाहने आहेत. यामध्ये फॉक्सवॅगन जेट्टा, होंडा सिटी आणि ओप्टा शेवरले या गाड्यांचाही समावेश आहे. शर्मा यांची एकूण संपत्ती ११,०७,५८,३३,१९० रुपये आहे. यातील ,०८,३३,१९० रुपये चल संपत्ती आहे.

मागे

राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदी आणि स्मृती इराणींचं अभिनंदन
राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदी आणि स्मृती इराणींचं अभिनंदन

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचं अभिन....

अधिक वाचा

पुढे  

पराभवानंतर मिलिंद देवरा यांची प्रतिक्रिया
पराभवानंतर मिलिंद देवरा यांची प्रतिक्रिया

दक्षिण मध्य मुंबईचे कॉंग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव झाला असून ....

Read more