ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Loksabha 2019: वर्ध्यात मैदान मोकळे असतानाही मोदी म्हणाले…

By GARJA ADMIN | प्रकाशित: एप्रिल 01, 2019 07:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Loksabha 2019: वर्ध्यात मैदान मोकळे असतानाही मोदी म्हणाले…

शहर : वर्धा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्ध्यातील सभेत गर्दी खेचून आणण्यासाठी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या. परंतु एक लाख लोकांची बसण्याची क्षमता असणाऱ्या या सभास्थळावर मागच्या बाजूच्या खुर्च्या मात्र रिकाम्याच राहिल्या होत्या. लोकांनी खुर्चीवर खुर्ची ठेवत खुर्च्या एकत्र केल्या आणि त्यावर उभे राहून मोदींची सभा पहिली.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील पहिली प्रचारसभा सभा भाजप, शिवसेना, रिपाइं युतीच्या उमेदवारांकरिता महत्त्वाची मानली जात होती. गांधीभूमीतील या प्रचारसभेकरिता जय्यत तयारीही करण्यात आली होती. मात्र, मागील वेळीच्या निवडणुकीप्रमाणे यंदा नरेंद्र मोदी अपेक्षित गर्दी जमविण्यात अपयशी ठरले. या सभेला 30 ते 35 हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता. मोदी यांचे भाषण सुरू असताना पारा 42 अंश सेल्सिअसवर होता. रखरखत्या उन्हात घामाच्या धारा वाहत असताना मोदींच्या भाषणाचा ज्वर चढत होता; मात्र उष्णतेच्या काहिलीने त्रस्त झालेल्या अनेक महिला-पुरुषांनी वृक्षांचा आसरा घेतला, तर काहींनी भाषण सुरू असतानाच परतीचा मार्ग धरला.उपस्थित जनसमुदायाविषयी वेगवेगळे दावे करण्यात येत असले तरी मोदींचे भाषण सुरू असताना मागील बाजूचे खाली मैदान बरेच काही बोलत होते. महत्त्वाचे म्हणजे या पार्श्‍वभूमीवरही मोदी यांनी स्वतःच मैदान संपूर्ण भरल्याचे सांगत 'जहा खडे हो, वही रहो', असे आवाहन केले.

मागे

loksabha 2019 : मनसेचा काँग्रेसला पाठिंबा, संजय निरूपमना मात्र ठेंगा!
loksabha 2019 : मनसेचा काँग्रेसला पाठिंबा, संजय निरूपमना मात्र ठेंगा!

आगामी लोकसभा निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देत उमेदवारांचा प्....

अधिक वाचा

पुढे  

लोकसभा निवडणूक २०१९ : आज काँग्रेसचा जाहीरनामा राहुल गांधी करणार प्रसिद्ध
लोकसभा निवडणूक २०१९ : आज काँग्रेसचा जाहीरनामा राहुल गांधी करणार प्रसिद्ध

लोकसभा निवडणूक २०१९ साठी काँग्रेस आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. दु....

Read more